Nojoto: Largest Storytelling Platform

चारित्र्य कोणास काय सांगू कोणास काय बोलू? कानावरी

चारित्र्य

कोणास काय सांगू कोणास काय बोलू?
कानावरी पडे ते ऐकून छान डोलू!

हे दुःख काय माझे नि दुःख काय तुझे?
ना दाबता सलांना बिनधास्त पोल खोलू!

जो भेटतो अताशा आश्वासनेच देतो,
स्वार्थात ठार वेड्या धनदांडग्यास कोलू!

मुर्दाड कोंबड्यासम तऱ्हा खरेच झाली,
जीतेपणीच चमडी का लागलेत सोलू?

आता विचार व्हावा थोडा बरोबरीचा,
नाते नकोस पाहू चारित्र्य आज तोलू!

जयराम धोंगडे, नांदेड
(९४२२५५३३६९)

©Jairam Dhongade #footprints
चारित्र्य

कोणास काय सांगू कोणास काय बोलू?
कानावरी पडे ते ऐकून छान डोलू!

हे दुःख काय माझे नि दुःख काय तुझे?
ना दाबता सलांना बिनधास्त पोल खोलू!

जो भेटतो अताशा आश्वासनेच देतो,
स्वार्थात ठार वेड्या धनदांडग्यास कोलू!

मुर्दाड कोंबड्यासम तऱ्हा खरेच झाली,
जीतेपणीच चमडी का लागलेत सोलू?

आता विचार व्हावा थोडा बरोबरीचा,
नाते नकोस पाहू चारित्र्य आज तोलू!

जयराम धोंगडे, नांदेड
(९४२२५५३३६९)

©Jairam Dhongade #footprints