Nojoto: Largest Storytelling Platform

White # फुंकर शब्दवेडा किशोर हा मंद गारवा अन् पहाट

White # फुंकर
शब्दवेडा किशोर
हा मंद गारवा अन् पहाटवारा
गंधाळूनी जाई श्वास सारा
तलमस्पर्शी भाव हे माझ्या
आयुष्यरूपी फुलाचे नकळत
मनास बिलगुनी मग जाई
अन् आपसुकच मनाला सुंदरता देई
कोणत्या नवचैतन्याच्या झऱ्यास 
रोज नव्याने जागवुनी धरा ही
रोज नवे प्रसन्नतेचे लेणे
स्व:अस्तित्वावर लेऊनि घेई
एक आस आहे मनी की
मिळावी अशीच मायेची फुंकर
रोज नव्याने माझ्या मना
जी माझ्या अस्तित्वाला
रोज नव्या स्वप्नांचे रंग देई

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
White # फुंकर
शब्दवेडा किशोर
हा मंद गारवा अन् पहाटवारा
गंधाळूनी जाई श्वास सारा
तलमस्पर्शी भाव हे माझ्या
आयुष्यरूपी फुलाचे नकळत
मनास बिलगुनी मग जाई
अन् आपसुकच मनाला सुंदरता देई
कोणत्या नवचैतन्याच्या झऱ्यास 
रोज नव्याने जागवुनी धरा ही
रोज नवे प्रसन्नतेचे लेणे
स्व:अस्तित्वावर लेऊनि घेई
एक आस आहे मनी की
मिळावी अशीच मायेची फुंकर
रोज नव्याने माझ्या मना
जी माझ्या अस्तित्वाला
रोज नव्या स्वप्नांचे रंग देई

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून