White #मी कवी नाही.... शब्दवेडा किशोर मी छान लिहितो..असं जवळचे म्हणतात...मी भावना व्यक्त करतो पण त्या जो कवीमनाचं असतो किंवा ज्याला खरंच माणसातलं माणूसपण कळतं त्यालाच कविता समजतात पण मीच स्पष्ट करतो..मी कुणीही कवी नाही व हे जे काय लिहितोत्याचं श्रेयही माझं नाही.ती जीवनात येण्याआधीही मी लिहायचो पण मला असं वाटतं की माझ्या लेखणीला खरी धार ती आयुष्यात आल्यानंतर मिळाली.ती आयुष्यात आली अन् नकळत मी कधी अलगदपणे तिच्या सहवासात गुंतत गेलो,गुरफटत गेलो ते मला कळलं देखील नाही अन् स्वतःला शब्दात कसा हरवत गेलो तेही मज उमजलं नाही. आधी माझ्या कविता आणि लेख हे फक्त लिखाण होतं असं मला वाटतं पण आता ती जीवनात आली आणि बहुधा माझ्या लेखणीस नवी प्रेरणा मिळत गेली.हल्ली माझ्या कविता म्हणजे जास्त करून तिचा न माझा अदृश्य स्वरूपातला संवाद असतो.ती जवळ नसतानाही तिच्याच धुंदीत जगण्याचा तो एक बहाणा असतो.बहुतेक तीच माझ्या लेखणीतलं शब्दस्वरूप होऊन मला सतत भेटत असते अन् माझ्या मनीच्या भावना कागदावर उतरवत असते.हे शब्दच माझं आता बहुतेक जगण्याचं नवं स्वरूप झालं आहे अन् अजूनही या सगळ्यात मी काही खुप मोठा लेखक किंवा कवी नाही एवढंच तुम्हा सर्वांना सांगणं आहे. ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर