Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या परतीच्या प्रवासात जेव्हा तुझं शहर लागतं...

माझ्या परतीच्या प्रवासात जेव्हा तुझं शहर लागतं...
तिथे मी थांबतो थोडावेळ,
आठवणींचा आपल्या मांडतो एक खेळ,
घास अडल्यासारखा जसा भरल्या ताटावर,
घुटमळत रहातो त्या स्टेशनच्या बाकावर,
उगाच नंतर फिरून येतो आपल्या जागा,
तुझ्या नसण्याचा जिवाला आणखी त्रागा,
त्या गर्दीत पहात राहतो चेहरे निरखून,
एक तरी चेहरा त्यातला यावा ओळखून,
तुझं न येणं एव्हाना निश्चित झालं असतं,
खोटं एखादं कारण ही देता आलं असतं,
हताश होऊन निघताना मी एकदा वळायला हवं,
तुझ्या शहरात मी आल्याचं तुला कळायला हवं,
तू पुन्हा एकदा दिसावं, हेच तर मन मागतं,
माझ्या परतीच्या प्रवासात जेव्हा तुझं शहर लागतं...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar #CityWinter