Nojoto: Largest Storytelling Platform

जातीपातीचे कोडे सुटेल का? एकच असे विश्वविधाता निर

जातीपातीचे कोडे सुटेल का?

एकच असे विश्वविधाता
निर्मिली त्याने एक मानवजात
एकाच ईश्वराची आपण लेकरे
तरीही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई
कधी विभागलो कळलेच नाही.....
सर्वांच्या अंगी सळसळतो
फक्त लाल रंग
तरीही फडकतो वाऱ्यावर जातरंग
कुठे गेली ती भारतीय संस्कृती?
विविधतेत एकता जपण्याची
स्मरावा गौरवशाली इतिहास
क्रांतिकारांच्या गळ्यातील फास
जातीय दंगलीसाठीच का त्यांनी....
दिले आपले बलिदान?
जागवा स्वमनाला 
नि विचारा प्रश्न........
खरा तो एकचि मानवधर्म
मनामनात दरवळेल का?
आतातरी जातीपातीचे कोडे सुटेल का?
चला माणुसकीची ज्योत पेटवू 
मनांनात मानवसेवा रुजवू
असू देत कितीही......
वेगवेगळे रंग, वेश, भाषा,
तरीही नांदावी मनी नित्य
देशभक्तीची अभिलाषा 


निशा डांगे
पुसद जातीपातीचे कोडे सुटेल काय?
जातीपातीचे कोडे सुटेल का?

एकच असे विश्वविधाता
निर्मिली त्याने एक मानवजात
एकाच ईश्वराची आपण लेकरे
तरीही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई
कधी विभागलो कळलेच नाही.....
सर्वांच्या अंगी सळसळतो
फक्त लाल रंग
तरीही फडकतो वाऱ्यावर जातरंग
कुठे गेली ती भारतीय संस्कृती?
विविधतेत एकता जपण्याची
स्मरावा गौरवशाली इतिहास
क्रांतिकारांच्या गळ्यातील फास
जातीय दंगलीसाठीच का त्यांनी....
दिले आपले बलिदान?
जागवा स्वमनाला 
नि विचारा प्रश्न........
खरा तो एकचि मानवधर्म
मनामनात दरवळेल का?
आतातरी जातीपातीचे कोडे सुटेल का?
चला माणुसकीची ज्योत पेटवू 
मनांनात मानवसेवा रुजवू
असू देत कितीही......
वेगवेगळे रंग, वेश, भाषा,
तरीही नांदावी मनी नित्य
देशभक्तीची अभिलाषा 


निशा डांगे
पुसद जातीपातीचे कोडे सुटेल काय?
nishadange8800

Nisha Dange

New Creator

जातीपातीचे कोडे सुटेल काय? #poem