Nojoto: Largest Storytelling Platform

शोषितांचा, उपेक्षितांचा हुंकार दबल्या वेदनांचा लेख

शोषितांचा, उपेक्षितांचा हुंकार दबल्या वेदनांचा
लेखणीने घडविली क्रांती सम्राट शोभे साहित्याचा

घाव घातला अन्यायांवर थाप देवूनी अशी डफावर
रान पेटले असे चेतले अंगार पेरले मनां-मनांवर

उभारिला लढा चळवळीचा हक्क मागण्या श्रमिकांचा
दुवा संयुक्त महाराष्ट्राचा मोडीला कणा प्रस्थापितांचा

साहित्यातील चमकता हिरा तुम्ही प्रसवला तो फकिरा
इतिहासाच्या पानोपानी अजरामर झाला वीर खरा

बा भीमाच्या वारसदारा  जग बदलण्या सज्ज हो
क्रांतीची हाती मशाल घे शांती, समतेचा पाईक  हो

©Shankar kamble #विद्रोह 
#लढा 
#जयंती 
#अण्णाभाऊ साठे

#AWritersStory