Nojoto: Largest Storytelling Platform

वयाच्या ह्या टप्प्यावर येता,पाहतो जेव्हा लहान मुला

वयाच्या ह्या टप्प्यावर येता,पाहतो जेव्हा लहान मुलांना खेळता,
वाटे पुन्हा एकदा बालपण यावे,पुन्हा एकदा बालपणात रमून जावे.
पुन्हा एकदा बालपण यावे पुन्हा एकदा कल्ला करावा,
पुन्हा एकदा लहान होऊन गल्लीबोळात गोंधळ घालावा.
सुंदर असे ते बालपण होते,एकलेपणाचे कुणाला वेड नव्हते,
घोळक्यात सर्व खेळ चालायचे,लवकर बाद होणे कुणाला पसंत नव्हते.
सण येता कुठलेही नुसतीच धम्माल मस्ती राहायची,
होळी,धुलीवंदनला तर रंगासोबत खेळताना खूप मज्जा यायची.
येता गणेशोत्सव महिन्याभरापूर्वी पासूनच तयारी राहायची,
मंडपात,मिरवणुकीत फक्त देवाचीच गाणी वाजायची.
दिवाळीत एकत्र येऊन फराळ खाण्याची वेगळीच मजा असायची,
किल्ले बांधण्यात आणि फटाके फोडण्यात सारी रात्र सरायची.
प्रत्येक सणाचे त्या वेळेस एक वेगळेच महत्व असायचे,
द्वेष,राग,मत्सर कुणाच्या मनी नव्हते सर्व एकत्र राहायचे. शुभ संध्या मित्रहो
दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण
आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या...
आताचा विषय आहे
प्रिय बालपण...
#प्रियबालपण

चला तर मग लिहूया.