Nojoto: Largest Storytelling Platform

"बाप माझा" सतत कष्टात राबणारा बाप आम्ह

  


      "बाप माझा"
सतत कष्टात राबणारा बाप 
आम्हाला कधी कळलाच नाही
   देव्हाऱ्यातला देव ह्रदयात
     कधी रुजलाच नाही
          पायात  रुतलेला काटा 
         मात्र बरंच काही सांगून गेला
         बाप रे ! म्हणण्यापुरताच बाप
         तेवढा ओठात उरून राहीला
पोरांची हौस-मौज पुरवण्यात
बाप चंदनासारखा झिजत होता
पै-पै कष्टाने जुळवताना स्वत:
मात्र वातीसारखा जळत होता
         बापाचं काळजीपोटी ओरडणं
         त्यावेळी खूप त्रासदायक वाटत होते;
         पण आज मात्र त्याची संस्काराची 
         शिदोरी आयुष्य समृद्ध करत राहते.
काट्याच्या संरक्षक कवचाला विसरून
आम्ही गुलाबाला महत्व तेवढे देत गेलो.
   आईची थोरवी गाता-गाता 
बापाकडे मात्र कायमच दुर्लक्ष करीत राहिलो.
                          -सोमनाथ गावडे


 #बाप माझा
  


      "बाप माझा"
सतत कष्टात राबणारा बाप 
आम्हाला कधी कळलाच नाही
   देव्हाऱ्यातला देव ह्रदयात
     कधी रुजलाच नाही
          पायात  रुतलेला काटा 
         मात्र बरंच काही सांगून गेला
         बाप रे ! म्हणण्यापुरताच बाप
         तेवढा ओठात उरून राहीला
पोरांची हौस-मौज पुरवण्यात
बाप चंदनासारखा झिजत होता
पै-पै कष्टाने जुळवताना स्वत:
मात्र वातीसारखा जळत होता
         बापाचं काळजीपोटी ओरडणं
         त्यावेळी खूप त्रासदायक वाटत होते;
         पण आज मात्र त्याची संस्काराची 
         शिदोरी आयुष्य समृद्ध करत राहते.
काट्याच्या संरक्षक कवचाला विसरून
आम्ही गुलाबाला महत्व तेवढे देत गेलो.
   आईची थोरवी गाता-गाता 
बापाकडे मात्र कायमच दुर्लक्ष करीत राहिलो.
                          -सोमनाथ गावडे


 #बाप माझा

#बाप माझा