#विशालाक्षर #वाहतं_प्रतिबिंब नदीत पडलेली झाडाची तडफडणारी प्रतिबिंबं वाहत जावीत कधी कधी त्यांना हवं तिथं पर्यंत.. हवं तर समुद्रापर्यंत नाहीतर उगमा पर्यंत.. खितपत पडलेली ती प्रतिबिंबे पाहण्यास.. स्पष्ट नकार देणारे डोळे.. ते डोळे इतके गच्च मिटावेत की सगळं पाहायला लागावं जे आहे ते.. जसंच्या तसं.. फक्त मिटल्या नजरेनं.. आणि मग ती नजर वाहत राहावी तरंगत राहावी.. हवं तर अंतापर्यंत नाहीतर अंतापासून आदीपर्यंत.. ©Vishal Potdar