Nojoto: Largest Storytelling Platform
vishalpotdar6534
  • 25Stories
  • 2Followers
  • 209Love
    425Views

Vishal Potdar

  • Popular
  • Latest
  • Video
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

#विशालाक्षर

मारव्यातली एक विलंबित बंदिश
संधीकाळाच्या चित्रात 
कैद व्हावी..

ते चित्र पाहताना 
त्यातल्या क्षितिजातल्या रंगात
गहिरा होत जाणारा आलाप
जसा जाणवेल

तसेच काहीसे
आजकाल 
तुझ्याकडे पाहताना वाटते....

©Vishal Potdar
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

सायंकाळच्या ताम्रपटावर कोरलेल्या
आपल्या भेटींच्या तारखा 
अजूनही तशाच आहेत..

टेकडीच्या टोकाशी जाऊन
सूर्यास्ताची वेळ वाढवून घ्यायचो आपण..
एकमेकांचे सोनेरी स्पर्श
अंगी घेत..
पूर्ण क्षितिजभरून आपली नजर 
एकमेकांत विरघळून जायची..

तुझ्या कवितेत एक ओळ होती
"सायंकाळच्याच निष्पाप मूशीमध्ये 
सुर्याचं फुल होऊन जातं.."

पण आज एकटं त्याला पाहताना
केविलवाणा दिसतो तो..

तो आभाळ मालवून गेला तरी
एकमेकांना दिसेनासे होईपर्यंत
आपण तिथेच थांबायचो..

आता सूर्यास्ताची वेळ वाढवून घेऊ वाटत नाही 
आभाळ कोरं झालं की
तिथे थांबवत नाही...

पण तरीही प्रत्येकवेळी 
सूर्याचं फुल होणं पाहू वाटतं..
तुझ्या त्या ओळीने
ती वेळच मंतरुन टाकलीये..
आणि जिवंत ठेवलंय
माझं असणं..

©Vishal Potdar
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

नदीनेही राहावं काही दिवस
घरटं बांधून
समुद्रापार..

दगडी पेटीत बंद करून ठेवावी
सर्वांनी ठरवून दिलेली
वाट
वळणाची अदब
आणि प्रत्येक खिंडीत आखडून घ्यावं लागलेलं 
अस्तित्व..

परोपकारी हातांना
बांधून,
वाहतं ठेवावं ते
फक्त मन
स्वतःच्या आत...

कुणाला काही फरक पडो अथवा ना पडो..

परंतू नदीने एकदा तरी
गंगेसारखं संतापून
झोकून द्यावं 
थेट आभाळातून
कुणाचीही तमा न बाळगता..
आणि 
शांत होऊन
स्वतःच्या काठावर ध्यानस्थ होत
पुन्हा जन्मावं...
पुन्हा नव्याने जगावं..
उगम आणि विलीनीकरणाच्या मधलं
तिचं ओलेतं आयुष्य...
तिचं ओलेतं आयुष्य...


             - विशाल पोतदार

©Vishal Potdar
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

#विशालाक्षर
#विठोबाची_कविता

विठोबाची पावलं...
आता झिजत चाललीत..

टेकणाऱ्या प्रत्येक माथ्याला
एकेक कण स्वाधीन करत
विरत चालली आहेत...

एके दिवशी
पावलांसहीत तोच दिसेनासा झाला तर?

भांडायचं कुणाशी मग मी
हक्कानं...
मोकळ्या विटेकडे कशी मागावी उत्तरे
चक्रव्युहांची..
कोरड्याठाक पडलेल्या 
अनंत खोल गाभाऱ्यात
कसं उगवायचं पुन्हा पुन्हा....?
वारीअंती
भरल्या डोळ्यांनी
कुणाकडे पाहायचं
डोळे भरून..?

ब्रम्हतत्व व्यापून राहिलेलं असतं म्हणे
सर्वत्र......
सगळं सगळं मान्य..
परंतु आईच्या कुशीचा खराखुरा स्पर्श
नुसत्या आठवणींत नाही ना मिळत...

विठ्ठला..
विठ्ठला..
अजून लाखो युगे तरी...
असाच इथे थांब..
तुला परवानगी नाही
झिजण्याची..
तू बंदी आहेस
तुझ्या प्रेमात असणाऱ्या
या प्रत्येक जीवाचा...!!


      - विशाल पोतदार

©Vishal Potdar #Chalachal
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

#विशालाक्षर

नव्या कोऱ्या घराच्या नांदीत
जुनी भिंत उतरवताना
मनाच्या खिडक्या गलबलल्या
खूप आत
एक बाळ मुसमुसून रडू लागलं..

त्या पांढऱ्या मातीच्या अफाट जगातला
माझा पहिला श्वास
पहिला शब्द
पहिलं हसू
पुन्हा फेर धरू लागले 
व्याकुळ नजरेने..

फुटक्या कौलातून 
पाहिलेला प्रत्येक चंद्र
सगळ्या सगळ्या चांदण्या घेऊन
सांत्वन करायला उतरून आला
पण मन मानत नाही...
काही क्षण तरी नाहीच...

कसे खोडावे त्या भिंतींवर फिरलेले हात
कसे बुजवावेत 
रुसल्यावर कुशीत घेणारे कोपरे
कशा काढून टाकायच्या 
काही क्षण आयुष्य टांगून ठेवता येणाऱ्या खुंट्या

काही काही कळेनासं झालं
रडू ही कोसळत नव्हतं
काही भरल्या क्षणांनंतर
घराच्या मऊ कुशीत
रुसल्या मनाला निजवून
बांधून घेतली
आठवणींचा पाणवठा जन्मोजन्मी पुरेल इतकी
मूठभर मातीची शिदोरी.....



              - विशाल पोतदार

©Vishal Potdar
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

आटत चाललेल्या
एका नदीकाठी
पांढऱ्या फटक 
गवताच्या वेढ्यात
एक घर राहतं...

त्या घरात भरून ठेवलंय
हिरवं आकाश
ढगांची रास
पावसाची धार
आणि एक समुद्र...

पुरात तरंगून
दुष्काळातून उरून
आकाशाला छातीशी धरून
डगमगत का होईना 
ते उभं असलं तरी
यावेळेसच्या पुरात
काही सांगता नाही येणार
भुई पासून कौलापर्यंत
पाणी दाटून राहिलंय
आभाळ विरून जाऊ लागलंय
भिंतही थरथरू लागलीय
आणि आताशा अस्तित्वच वाहू पाहतंय..

पण
पण..
पण तरीही
पायात मुळांचं
बळ आणून
तिथं रोवून थांबायचंय..

नदीला एकदा वचन दिलं होतं
तुझा समुद्र होऊन राहीन
बस्स...
कायम..
तो वाहत नाही..
तो असतोच..
मीही
आहेच...


        - विशाल पोतदार

©Vishal Potdar #chai
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

#विशालाक्षर

एक दिवा फडफडू लागतो
तेव्हा दुसऱ्याने वात पणाला लावून
तेवून राहायला हवं

कधी कधी शांततेचंही वादळ
हलवून टाकेल
दोघांमधला पूल

कधी कधी प्रकाशाचा भयंकर झोत
दिपवून टाकेल
नुसतं असणंही..

अशावेळी..
घनदाट क्षणांतून
वेचायला हवा 
जादुई आभास..
आणि मंद अशा प्रकाशाला प्रसवत
न्हाऊन घालावं आपल्या माणसाला..
अंधाराची माती उरात पेरून
पोहोचवायला हवा
प्रेमाचा कोवळासा कोंभ..
वातीपासून
मनापर्यंत...

©Vishal Potdar
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

तुला आज पाऊस दाखवताना
कित्येक पाऊस आठवले
भिजक्याच मनानं
तुझी आणि पावसाची
ओळख करून दिली तेंव्हा
तू हात की पाय मारत
नातं गाढ केलंस लगेच...
पुढे
पाऊस तुझा ही मित्र होईल
गुपितं तुझीही ऐकून घेईल..
तू फक्त पावसाला
कायम तुझ्यात जागा दे
घट्ट वीण पक्की करत
हातात बांधून धारांचा धागा घे
आणि मग
एकेका शब्दात पाऊस उतरत 
भिजत राहुदेत असेच अनेक कागद..
                       - अमलू

                       - ममता बोल्ली

©Vishal Potdar

1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

तुला आज पाऊस दाखवताना
कित्येक पाऊस आठवले
भिजक्याच मनानं
तुझी आणि पावसाची
ओळख करून दिली तेंव्हा
तू हात की पाय मारत
नातं गाढ केलंस लगेच...
पुढे
पाऊस तुझा ही मित्र होईल
गुपितं तुझीही ऐकून घेईल..
तू फक्त पावसाला
कायम तुझ्यात जागा दे
घट्ट वीण पक्की करत
हातात बांधून धारांचा धागा घे
आणि मग
एकेका शब्दात पाऊस उतरत 
भिजत राहुदेत असेच अनेक कागद..
                       - अमलू

                       - ममता बोल्ली

©Vishal Potdar
1794b7c29e93914aff4cf0c97f9e3e62

Vishal Potdar

#विशालाक्षर
#Fathers_Day

बाभळीसारखा रखरखीत माणूस
कसा लेकराजवळ फुलपाखरू होतो

मख्ख दगडासारखा चेहरा
कसा पिटुकल्यापुढे नटसम्राट होतो

वेळच नसणाऱ्या माणसाचे
तासन्तास छोट्यासाठी खुले होतात

कफल्लक जरी झालाच तर
होतं नव्हतं ते त्या जीवाच्या नावे होऊन जातं..

बापपण स्वयंभू असतं..
हाताचा झोका
पायाची गाडी
श्वासांचं गाणं
मनाचा गर्भ 
हृदयाचा पान्हा होतो
आणि बाळासोबत..
एक बाप क्षणात जन्म घेतो...         

                    - विशाल पोतदार

©Vishal Potdar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile