Nojoto: Largest Storytelling Platform

दादा, आणला आव जरी कितीही लांडग्याचा वाघ होत नाही

दादा, आणला आव जरी कितीही
लांडग्याचा  वाघ होत नाही कधीही llधृ ll

जरी काढले पट्टे पिवळे
अंतरीचे उफराटे चाळे
कृतघ्नतेचे पाणी काळे
असत्याच्या गुंफले माळे
दादा ,नटला सजला कितीही ll1ll

अन्यायाचा हा बुरखा पांढरा
तोंडाचा नुसता पोकळ वारा
जाळल्या नच घामाच्या धारा
शत्रू विस्तव इथं पुरतोय दारा
दादा ,सोंग झोपेचं केलं तरीही ll2ll

©rajendrakumar bhosale #कधीही

#flowers
दादा, आणला आव जरी कितीही
लांडग्याचा  वाघ होत नाही कधीही llधृ ll

जरी काढले पट्टे पिवळे
अंतरीचे उफराटे चाळे
कृतघ्नतेचे पाणी काळे
असत्याच्या गुंफले माळे
दादा ,नटला सजला कितीही ll1ll

अन्यायाचा हा बुरखा पांढरा
तोंडाचा नुसता पोकळ वारा
जाळल्या नच घामाच्या धारा
शत्रू विस्तव इथं पुरतोय दारा
दादा ,सोंग झोपेचं केलं तरीही ll2ll

©rajendrakumar bhosale #कधीही

#flowers