Nojoto: Largest Storytelling Platform
rajendrkumarbhos6191
  • 155Stories
  • 137Followers
  • 8.3KLove
    4.6LacViews

Rajendrakumar Jagannath Bhosale

अध्यक्ष,वार करी दल ,(WKD,Ind)

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

आजचा अभंग १२१

कर्म भोग  पाप माला, नियतीचा फेरा आला,
असत्य अज्ञान घाला, कलियुगी ll धृ ll 

मिरविते खोटं नित्य ,पापाचरण सातत्य,
वदे लपवून सत्य, नीज देही ll १ll 

अल्प सुखाची भोवळ, संचीले कुकर्म वळ 
दैव संपविल खळ, राजे म्हणे ll २ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #leafbook
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

व्हेजिटेबल पुलाव कधी अंडा पुलाव
मटार पुलाव चणा पुलाव सोयाबीन पुलाव
मोड आलेल्या मटकीची उसळ
गोड खिचडी,मुगडाळ खिचडी,चवळी खिचडी
मुग शेवगा वरण भात,मसाले भात 
तांदळाची खीरनाचणीचे सत्व,
मोड आलेले कडधान्य

©Rajendrakumar Jagannath Bhosale #leafbook
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

ऊसुलोंका पक्का 
स्ता माने जिंन्होने तबले को सजीव बनाया 
दर्यादील तालो कां शहेनशाह 
झाकी तीलस्मी संगीत की 
किरदार ऐसा  की सभी को भाया 
रब ने भी उसे चाहा होंगा 
हुजर की खिदमात मे 
सेवा संगीत की करने 
नवाजा गया फनकार को कोटी कोटी सलाम l

©Rajendrakumar Jagannath Bhosale उस्ताद झाकीर हुसेन

उस्ताद झाकीर हुसेन #मराठीकविता

d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

आजचा अभंग १२०

बोथट झालीत शस्त्र, नात्यावर टाकी अस्त्र 
कोरड्या भावना वस्त्र, स्वीकारूनीll धृ ll 

गोंजरूनी अंधभक्ती, पोकळ विद्येची शक्ती 
 बीभत्स नाटकी व्यक्ती, पदोपदी ll १ll 

त्याग अहंकार मळ, विसर बौध्दिक चळ
 आठव गुलामीचे वळ, राजे म्हणे ll २ll 

कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले

©Rajendrakumar Jagannath Bhosale #traveling
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

आदिनाथ रूपा सकल त्राता 
त्रिगुणा विना अनंता 
 सद्गुरू नमो अवधुता ll धृll

अतिसूक्ष्म स्थितीत प्रत्यक्ष अवतारी
निर्गुण स्वरूपा  नित्य गुरूवारी 
सगुण निवास वसे औदुंबरा
 आशिष भेटे हरिभक्ता
त्रिगुणा विना अनंता 
सद्गुरू नमो अवधुताll १ll 

मादुगरी मागे कोल्हापुरी 
नर्सोंबाचे स्थळी दुपारी
वामकुक्षी गाणगापुरी 
निद्रिस्त गिरनारगिरी
शिव शक्तिच्या तूच नाथा 
त्रिगुणा विना अनंता 
 सद्गुरू नमो अवधुताll २ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #traveling
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

अभंग क्र.119

उजळू दे भग्न मन, तेजाळूया नवे कण 
जपून वापर धन, पुण्याईचे ll धृ ll 

सावध हो आता तरी, सांभाळ संसार दोरी 
स्वाभिमान जप ऊरी, व्यवहारे ll 1ll 

जप दया क्षमा शांती,  त्याग क्रोध तम भ्रांती 
 बंधुत्वाची जोड नाती, राजे म्हणे ll 2ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_quotes
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

आजचा अभंग 115

पाण्याविना  जीव नाही, प्रपंच सर्वत्र पाही 
कर्मा मध्ये देव राही, संसारात ll धृ ll

त्रिगुण जो त्यागुनिया, निर्गुण जो जाणोनीया 
सोहं नाद जाणोनीया, मोक्ष रेघे ll 1ll 

 सर्वत्र भरून उरे , त्या काळालां  जो स्मरे,
  पैलतिरी जाती सारे,राजे म्हणे ll 2ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale #GoodMorning
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

White ज्यांनी पूर्वजांच्या तत्त्वांचा कडीपत्ता केला 
त्यांचा कडीपत्ता व्हायला वेळ लागत नाही 

अजून वेळ गेली नाही त्या द्रष्ट्या विचाराची 
कर बदल सोंग टाकून सत्य स्वीकारण्याची

अर्धवट स्वार्थी माणसावर नको ठेवू विश्वास 
पैशासाठी बेगडी विचार हाच त्यांचा ध्यास 
  
स्वतः आहेस कोण, जाणून घे, उमजून घे
जन माणसातील खरा माणूस समजून घे,

दैव घडवण्या प्रयत्नाची ठिणगी विजवू नको 
धुंद परक्याच्या सावलीतून झाड लावू नको 

त्या पुरोगामी पूर्वजा प्रमाने करा आचार 
घराघरात पोहचवा लोकशाहीचा विचार

©Rajendrakumar Jagannath Bhosale #good_night
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

श्री मळाई माझी  माय माऊली 
देई कृपेची सावली ll धृ ll 

कमळभैरी बंधू जोडीला 
 वसतसे जखिनवाडीला 
देवीने भस्मासुर मारीला 
शिव रक्षा करण्याला 
जगनमाता माय धावली ll 1ll 

अठरापगड जाती जमाती 
उत्सवात दिवटे धरती 
ढोल ,हलगी वाजवती 
हार जागर दुपारती
जमली सारे भक्त मंडळी ll 2ll 

कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले 
मो क्र 9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_quotes
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

स्वप्न पहिली पंचायत राज्याची 
लक्तर झाली जाती जमातीची 

मांगाची दोर घेतली गरवारे नी 
चपला बूट विकल्या बाटानी 

ग्राम संकल्पना फक्त कागदावर 
इथ लोकशाही फक्त नोटांवर 

 सत्ता संपत्ती फक्त क्षेत्रपालाकडे 
घाम मोलमजुरी उरली  मजुराकडे 

अर्थ नाड्या भांडवलदारा कडे 
सत्तेच्या चाव्या मूठभरांकडे 

गांधीजींची माकडे झाली चार 
मोबाईल मुळे गुंगलेत  फार 

वाट पाहतो नव्या विचाराची,
शुद्ध आचाराची, सूव्यवस्थेची

©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_qoute
loader
Home
Explore
Events
Notification
Profile