Nojoto: Largest Storytelling Platform

#फिरुनी नवा जन्मेन मी.... कोवळी ती माझ्या आयुष्य अ

#फिरुनी नवा जन्मेन मी....
कोवळी ती माझ्या आयुष्य अस्ताची झुळुक
मज अनाहूतपणे बिलगुन गेली
मावळतीचा तो सुगंध वाऱ्याचा होता मजभोवती
तयाचे ती झुळूक बोट धरून निघून गेली
नशीबाने होते छाटलेले तेव्हा ते
पंख माझे सोनेरी गळून गेले
अन् रूतलेल्या काट्यांनी मग
आपसुक मला अखंडीत जपले
काटेरी रस्त्यावरची माझी ही
आयुष्यप्रवासाची यात्रा झाली
तिथेही माझ्या मातीनं जन्मभर
माझी सोबत केली
आजही माझ्या सुवर्णासम त्या
आयुष्यपाकळ्यांना ती जपते आहे
अन् रोज नव्याने मग जगाला
ती ओरडून सांगते आहे
पुन्हा तू नव्यानं उमलणार अन्
धरेचं ते सौंदर्य अखंडपणे जपणार
तिच्या साक्षगंधाने मी
शब्दवेडा किशोर सांगतो तुम्हाला की
घेऊनी श्वास पुन्हा नव्याने
आयुष्याचे सप्तसुर छेडीन मी
अस्त जरी माझा झाला तरीही पुन्हा
अंकुर होऊनी फिरुनी नवा जन्मेन मी
फिरुनी नवा जन्मेन मी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #फिरुनी_नवा_जन्मेन_मी
#फिरुनी नवा जन्मेन मी....
कोवळी ती माझ्या आयुष्य अस्ताची झुळुक
मज अनाहूतपणे बिलगुन गेली
मावळतीचा तो सुगंध वाऱ्याचा होता मजभोवती
तयाचे ती झुळूक बोट धरून निघून गेली
नशीबाने होते छाटलेले तेव्हा ते
पंख माझे सोनेरी गळून गेले
अन् रूतलेल्या काट्यांनी मग
आपसुक मला अखंडीत जपले
काटेरी रस्त्यावरची माझी ही
आयुष्यप्रवासाची यात्रा झाली
तिथेही माझ्या मातीनं जन्मभर
माझी सोबत केली
आजही माझ्या सुवर्णासम त्या
आयुष्यपाकळ्यांना ती जपते आहे
अन् रोज नव्याने मग जगाला
ती ओरडून सांगते आहे
पुन्हा तू नव्यानं उमलणार अन्
धरेचं ते सौंदर्य अखंडपणे जपणार
तिच्या साक्षगंधाने मी
शब्दवेडा किशोर सांगतो तुम्हाला की
घेऊनी श्वास पुन्हा नव्याने
आयुष्याचे सप्तसुर छेडीन मी
अस्त जरी माझा झाला तरीही पुन्हा
अंकुर होऊनी फिरुनी नवा जन्मेन मी
फिरुनी नवा जन्मेन मी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #फिरुनी_नवा_जन्मेन_मी