Nojoto: Largest Storytelling Platform

°मायबोली माझी मराठी ° मायबोली ही माझी मराठी फुल

°मायबोली माझी मराठी ° 

मायबोली ही माझी मराठी 
फुलविली तुका जनाईंनी 
अमृताते पैजा पैजा जिंकी 
ज्ञानदेवांच्या त्या ओवींनी 

सांगतसे ते ज्ञान माउली 
जगा मराठीत गीता सार 
एकनाथ ही गायी भारुड 
चोखामेळा करतो जोहार 

वृक्षवल्ली हे सगे सोयरे 
सांगुनिया आम्हा तुका गेले 
दासबोध नि श्लोक मनाचे
संत रामदासां घडविले 

गेली सांगून बहिणाबाई 
आम्हा संसाराचे सारासार 
जनाबाई ती गातसे ओवी 
दळण दळीत भारभार 

मुक्ताबाई नामदेव गोरा
एकनाथ ते सावता माळी 
गाडगे बाबा नि नरहरी 
सारी संतांचीच मांदियाळी 

अशी माझी ही माय मराठी 
संत सज्जनांनी रुजविली 
ही श्रींची ईच्छा शिरसावंद्य 
शिवरायांनी ती वाढविली 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav मराठी राजभाषा दिन
°मायबोली माझी मराठी ° 

मायबोली ही माझी मराठी 
फुलविली तुका जनाईंनी 
अमृताते पैजा पैजा जिंकी 
ज्ञानदेवांच्या त्या ओवींनी 

सांगतसे ते ज्ञान माउली 
जगा मराठीत गीता सार 
एकनाथ ही गायी भारुड 
चोखामेळा करतो जोहार 

वृक्षवल्ली हे सगे सोयरे 
सांगुनिया आम्हा तुका गेले 
दासबोध नि श्लोक मनाचे
संत रामदासां घडविले 

गेली सांगून बहिणाबाई 
आम्हा संसाराचे सारासार 
जनाबाई ती गातसे ओवी 
दळण दळीत भारभार 

मुक्ताबाई नामदेव गोरा
एकनाथ ते सावता माळी 
गाडगे बाबा नि नरहरी 
सारी संतांचीच मांदियाळी 

अशी माझी ही माय मराठी 
संत सज्जनांनी रुजविली 
ही श्रींची ईच्छा शिरसावंद्य 
शिवरायांनी ती वाढविली 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav मराठी राजभाषा दिन
devanandjadhav3540

Devanand Jadhav

New Creator
streak icon20

मराठी राजभाषा दिन #मराठीकविता