Nojoto: Largest Storytelling Platform

                                          खूप लोका

                                          खूप लोकांच्या तक्रारी असतात. आमचे ज्यांच्याशी नाते आहे. ते आम्हाला वेळ च देत नाही. दुसऱ्या च सोडा माझ्या वरून च मी सांगते मी पण माझ्या फ्रेंड्स, भावंडाणा, फॅमिली मेंबर कोणी ही असेल जर त्यांनी मला कधी वेळ दिला नाही तर मी रागावते तक्रार करते. मग मी विचार केला, ज्यांना मी माझे सर्वस्व मानते, पण मी त्यांच्या साठी शेवटच्या नंबर ला आहे बहुतेक, माणूस वेळ तेथे च देतो जेथे त्याची रुची असते.आपण जबरदस्ती ने एखाद्याला आपल्याशी बोलायला लावू शकत नाही. आणि जर तरी तो आपल्यावर दया दाखवून किंवा आपलं मन राखण्यासाठी बोलला तरी ,त्याच मन मात्र दुसरीकडे कडे असते.आपला प्रियकर किंवा प्रियसी किती बिझी असली जर त्याच किंवा तीच तुमच्या वर खरच प्रेम असेल तर ते तुमच्या शी बोलायला वेळ काढतील च, असं होऊ च शकत कोणत्याही वेक्ती कडे थोडा ही वेळ नसेल का की तो तुमच्या शी बोलू नाही शकणार,आपण किती ही बिझी असलो तरी आपण जेवतो ना, पाणी पितो ना, फिरायला ही जातो, आपली जी आवड आहे ती आपण जोपासतो.मग जी आपल्यासाठी जीव टाकतात त्यांना थोडा तरी वेळ द्यायला हवा असं मला तरी वाटत. जर प्रेम असेल तर च ती किंवा तो आपल्या साथीदाराला वेळ देतो, प्रेम नसून फक्त टाइम पास असेल तर तो किंवा ती फक्त गरजेपूरत संपर्कात असतात.पण कोणत्याही नात्या साठी वेळ इतकी का महत्वाची असते. आपण ज्याच्या सोबत जास्त वेळ घालवतो आपल्या मनाचा लगाव त्याच्या कडे च जास्त असतो.मग तो आपला जोडीदार असो, फॅमिली असो, फ्रेंड्स असो, की आपले काम असो, आपल मन तेथे च लागेल,जेथे आपलं मन लागत, आपल्या चेहऱ्यावर हसू येत तेथे च मन गुंतवलेलं कधी ही चांगल,वेळ देण म्हणजे नक्की काय?
वेळ देण म्हणजे आपल्या आयुष्याचा भाग कोणाला तरी देणे,कोणी जर तुम्हाला वेळ देत असेल तर तो फक्त त्याचा वेळ देत नाही तुम्हाला तो स्वतः च आयुष्य तुम्हाला देतो.म्हणून कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवणे गरजेचं आहे.जर एकमेकांच्या सोबत वेळ घालवला च नाही. तर भावनिक दृष्ट्या कसे ते जोडले जातील.कसे एकमेकांना समजून घेतील, एखाद्या विद्यार्थ्याला उच्च पदवी हवी असेल तर त्याला किती वेळ द्यावा लागतो.कोणताही टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा च लागतो. आयुष्यात जे काही आपल्याला हवं असत त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा च लागतो,तस नात्या च्या बाबतीत  तस च  आहे. आपण एखाद्या नात्याला वेळ दिला नाही. तर ते नाते कधीच मजबूत होणार नाही.जर समोर चा वेक्ती तुमच्या साठी कधीच अवलेबल नसेल, नेहमी बिझी असेल, तर समजून जा त्याच्या आयुष्यात तुमचा नंबर लास्ट नंबर ला आहे.म्हणून त्याला कधीच विचारायचं नाही. त्याच्या आयुष्यात तुमचे स्थान काय आहे. स्वतः च्या मनाला च विचारा समोर च्या वेक्ती च्या आयुष्यात तुमची काय जागा आहे.ज्या माणसाच तुमच्या वर खरच प्रेम आहे. तो तुमच्या साठी कसा ही वेळ काढेल,हे मोबाईल चे युग आहे. लोक दिवस भर फोन हातात घेऊन फिरतात, मग इतक असून ही समोरच्या वेक्ती कडे इतका ही वेळ नाही आहे तो तुमच्या शी बोलेल,तुम्हाला मेसेज करेल, तुमच्या मेसेज चा रिप्लाय देईल, पण तो तुम्हाला जर वाट पाहायला लावत असेल तर समजून जा जी जागा तुम्ही समोर च्या ला दिली आहे. पण त्याने ती जागा तुम्हाला दिली नाही आहे.जर तुम्ही  तुमच्या नात्या विषयी सिरीयस असाल तर एकमेकांना वेळ दया आणि ते नाते घट्ट बनवा, आणि जर कोणी तुम्हाला वेळ देत नसेल, तुमच्या पासून दूर राहणं त्याला आवडत असेल, तर कोणाला विचारायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः च्या मनाला विचारा, सत्य तुमच्या समोर आहे. स्वतः ला वारंवार त्रास करून घेण्यापेक्षा पुढे जा आणि आयुष्य नव्याने सुरु करा आणि भविष्य उज्ज्वल बनवा,......
मला इतकं च या लेखावरून सांगायचं आहे. कोणतेही नाते असलं तरी त्यात वेळ देण किती महत्वाचं असत. त्यामुळे ते नाते किती घट्ट बनत, आणि ज्या नात्यात वेळ भेटत नसेल, फक्त तिरस्कार भेटत असेल अश्या नात्यातून दूर जाण योग्य,...........

©Monika
  #lonely वेळ देण का महत्वाचं असत
monika2318417777175

Monika

Bronze Star
New Creator

#lonely वेळ देण का महत्वाचं असत #मराठीविचार

188 Views