असतात अशी ही लोकं. जो आहे जसा तो देत असतो तसा. नाही मिळाले मला तसे ? असे म्हणणे शोभत नाही तुला हे माणसा. वाटाड्या होऊन मार्ग शोधणे असा संघर्ष नको वाटतो बिनकाम्याला. जो शोधतो ,नवीन काही करतो असे बघुनी नावे ठेवतात त्यांच्या जगण्याला. दुसऱ्याच्या काहीतरी करण्यामध्ये अडथळा आणणे जमते अशा लोकांना. डोकं जिथं आपले सुधारण्यासाठी हवे ते चालते दुसऱ्याच्या वाईट करण्यांना. दाखवतात हुशार लोक दुसऱ्यांच्या चुका आपले सांगण्यासाठी तो नेहमी असतो मुका. अशाच लोकांना होते जास्त दुःख जगण्यात आपले अर्धवट पोट परंतु दिसते दुसऱ्यांची भुक. सकारात्मक बघण्याची व्हावी सर्वांची दृष्टी आपोआपच सुंदर दिसू लागेल सृष्टी. जो दिसेल , जो असेल किंवा जेवढे असतील कष्टी थोडं तरी कमी करू शकेन असा घडो मी त्या संकटी. कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #लोकं.#शुभविचार.#सुविचार. #NationalSimplicityDay