White मनात असंख्य प्रश्न असताना त्याची उत्तरं शोधत राहतो.. एके दिवशी लेकीला बाप पाहुणा होऊन जातो.. नाजूक सुंदर बाहुलीला कोणीतरी रडवून जातो.. हळव्या मनाचा बाप अश्रू गाळत राहतो.. जरावेळ कोणी मागितली गाडी तरी जीव खाली वर होतो.. लहानपणापासून जपलेली बाहुली सहज दुसऱ्याला देतो.. काळजावर दगड ठेवून तो कन्यादान करू पाहतो.. खरं सांगायचं झालं तर बाप काळीज देऊन जातो.. बाप काळीज देऊन जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर कन्यादान