Nojoto: Largest Storytelling Platform

देव मलाच का इतकी दुःख संकटे देतो. माझा तर आता देवा

देव मलाच का इतकी दुःख संकटे देतो.
माझा तर आता देवावरचा विश्वासाचं उडालाय. 
असे जेव्हा आपल्याला वाटायला लागते.
तेव्हा समजून जायचे देव आपली 
परीक्षा पाहात आहे.जसे सोनार खरे सोने 
पारखण्यासाठी सोन्याला अग्नीत टाकून त्याची
 परीक्षा करतात.अगदी तसेच देवाचे असते.आपल्या  आवडत्या लेकरूने जीवनातील कठीणातील कठीण परीक्षा पास व्हाव्यात .तिथे तो नापास होऊ नये. 
म्हणून देव दुःखावर दुःख संकटे देऊन 
आपली परीक्षा पाहात असतो.आणि परीक्षेपूर्वीची 
तयारी आपल्याकडून करवून घेत असतो.
म्हणून जेव्हाही दुःख संकटे आली की 
दुःखी होऊ नका आनंदी व्हा. यासाठी की
 आपण देवाचे लाडके लेकरू झालोत.
आणि म्हणून तो आपली परीक्षा पाहात आहे. 
परीक्षेत पास होण्यासाठी सज्ज राहा.
आणि आपली सहनशक्ती
 देवावरचा विश्वास ढळू देऊ नका.

©suwarta
  #s♥️a#
suwarta3290

suwarta

New Creator

s♥️a# #ज़िन्दगी #S♥️A

297 Views