White सूत्र शब्दवेडा किशोर अंकलिपीपासून खरं तर याची आयुष्यात सुरुवात होते पायऱ्या पायऱ्यांनी मग ते पुढे अवघड होत जाते रोजच्या आयुष्याचे असतात इथे तेच जुने पाढे पण लक्षातच राहत नाही बेरजेच्या मागे धावता धावता उत्तर मात्र सदा वजा येई चपखल असा सुटत नाही तो मग जीवनाचा गुणाकार अन् भागाकार उरतंच राहते बाकी काहीतरी देताना जीवनास रोज नवे आकार कधी सुखाचा करावा लागतो गुणाकार तर कधी आपसुक दुःख करते बेजार कुठे जाऊन मांडावा सांगा ना मग असलेला हा अजब आकड्यांचा बाजार आयुष्याचे हे गणित मग जीवनभर सोडवताना हाती आले ते सूत्र हिशोब सारा मांडताना अनुभवाचे सूत्र करून कंसाबाहेर मी ठेवले साऱ्या समस्यांना मात्र आपसुकपणे कंसातच अडकवले आता जमतोय मज आयुष्याचा हा रोजचा नवा ताळमेळ विचाराच्या त्या नव्या भ्रमंतीचा झटकन मग उत्तर मिळते अन् सुटतो कोड्यांचा तो पाश कठीण अशा त्या विसंगतीचा म्हणून कदाचित गणित हा विषयच कठीण असेल ज्यांना समजले हे सूत्र तो आयुष्यात खरंच वेलसेटल असेल ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर