White #तुझीच राधा होण्याचं भाग्य मी कमवेन.... शब्दवेडा किशोर झाले बेधुंद मी हरपले भान माझे शापाचा हा दीर्घाकाळ सरला मजा माझ्या केशवाचे दर्शन नाही सय मनात मावेना धग उरात सोसेना जणू अस्तित्वरंग फिके पडले माझे.... ये धावूनी झडकरी केशवा तु देऊनिया तूझ्या अस्तित्वाचे दर्शन मज कर पावन माझा जन्म तु माझ्या आयुष्यपटलावर रेखीतो मी दीर्घाकाळापासून जे तुझं चित्र त्यात तुझ्या अस्तित्वाचे रंग भर तु.... येऊनी लवकरी माज समोर तु माझ्या विरलेल्या जगण्याला नवा आकार दे करुनी माझा जन्म सार्थक मजला तुझ्या मुकुटातली मोती माळ होऊ दे.... यावेळी आलास की नको ठेऊ कसले सवाल जवाब अन् नको ठेऊ कुठली अंतराची ही अंतरं तुझ्या हृदयपटल्यावर कायमसाठी विराजमान होण्याचं भाग्यसुख मज लाभू दे.... तुलाच पाहीन तुझ्यातंच जगेन अन् भरेल जीवन घटिका जेव्हा माझी तेव्हा तुझ्यातच विरून जाईल मी तुझ्या संगती हा देह त्यागीन अन् घेऊनि पुन्हा नवा जन्म तुझ्याच संगती तुझीच राधा होण्याचं भाग्य मी कमवेन.... ©शब्दवेडा किशोर #कृष्णप्रेम