Nojoto: Largest Storytelling Platform

White #रित्या मनाची ओंजळ.... शब्दवेडा किशोर खुप सा

White #रित्या मनाची ओंजळ....
शब्दवेडा किशोर
खुप सारं साठवून ठेऊन मात्र अखेर एकदा आभाळ बरसलं
भावनांनी मनाचा उंबरठा ओलांडावा असं म्हणलं
नभीच्या धारांना त्या धरेची अतृप्त ओढ होती
उंबऱ्यातल्या मनाच्या मोकळ्या आकाशाची जणू त्यांना आस होती
जव अतृप्त त्या ओढीनं आलेला एक गच्च मिठी मारून मनीचा तो ऊंबरठा ओलांडला तव अनाहूतपणे भावनांच्या सरी बेभान होऊन मुक्त झाल्या अन् दोघांचीही अशांत मनं पुरती क्षमली होती
आताच कुठंतरी दोघांचीही ती रित्या मनाची ओंजळ
छान सुखांच्या सरींनी पूर्ण भरली होती

©शब्दवेडा किशोर #रित्यामुठीतमाझ्या