Nojoto: Largest Storytelling Platform

अबोला म्हणजे काय असतो तो तुला नाही कळणार,अलगद कोणी

अबोला म्हणजे काय असतो
तो तुला नाही कळणार,अलगद
कोणीतरी पद्माला गोंजारणार त्या
क्षणी भृंग येऊन पाकळीच मिटणार
तोच तर हातांशी असणारा अबोला
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अलगद उनपावसाचा खेळ चालवा
आणि अचानक सप्तरंगी इंद्रधनुष्य
दिसावे आणि ते सुख नयनी साठवणार
तोच अचानक कृष्णरंगी झाकोळ यावे
तोच तर रंगांचा होणारा डोळ्यांशी अबोला
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
प्राजक्ताने मनस्वी फुलावे,श्वेत वस्त्रे 
लेवुन केशर लावावे,त्या स्वर्गीय 
सुमनाला समीराने ,तरुवरून 
लोटून द्यावे ,होवूनी,अनिवासी 
बेघर व्हावे,हाच तो तरु आणि
सुमनांच्या दुराव्याच्या अबोला
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
रेशमी अलवार वारे,केश कुंतले डोलणारे
ह्या क्षणी तुझ्या करस्पर्श्याचे जाळे,
भावनांना करुनी मोकळे आणि अचानक
स्पर्श् थांबणे,तुझे ते विलग होणे, हाच
तर तुझ्यानी माझ्यातील निशब्द अबोला
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
             पल्लवी फडणीस,भोर✍
अबोला म्हणजे काय असतो
तो तुला नाही कळणार,अलगद
कोणीतरी पद्माला गोंजारणार त्या
क्षणी भृंग येऊन पाकळीच मिटणार
तोच तर हातांशी असणारा अबोला
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अलगद उनपावसाचा खेळ चालवा
आणि अचानक सप्तरंगी इंद्रधनुष्य
दिसावे आणि ते सुख नयनी साठवणार
तोच अचानक कृष्णरंगी झाकोळ यावे
तोच तर रंगांचा होणारा डोळ्यांशी अबोला
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
प्राजक्ताने मनस्वी फुलावे,श्वेत वस्त्रे 
लेवुन केशर लावावे,त्या स्वर्गीय 
सुमनाला समीराने ,तरुवरून 
लोटून द्यावे ,होवूनी,अनिवासी 
बेघर व्हावे,हाच तो तरु आणि
सुमनांच्या दुराव्याच्या अबोला
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
रेशमी अलवार वारे,केश कुंतले डोलणारे
ह्या क्षणी तुझ्या करस्पर्श्याचे जाळे,
भावनांना करुनी मोकळे आणि अचानक
स्पर्श् थांबणे,तुझे ते विलग होणे, हाच
तर तुझ्यानी माझ्यातील निशब्द अबोला
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
             पल्लवी फडणीस,भोर✍