Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या डोळ्यांत जे साचलंय, कदाचित मी ते वाचलंय...

तुझ्या डोळ्यांत जे साचलंय,
कदाचित मी ते वाचलंय...
फार काही नाही थोडे ओलसर वाटले,
कुणासाठी सांग ते अश्रू आहेत दाटले ?
तुझं अस्तित्व वाहतं इतरांना जपण्यावर,
म्हणून स्वतःसाठी पाणी उरतं पापण्यांवर,
जगाने पाहू नये इतकी काळजी घेतेस,
हे असं करून स्वतःला किती त्रास देतेस,
जिद्द दिसते तयांत भरारी घेण्याची,
अस्तित्वाला तुझ्या उंचावर नेण्याची,
तरी आपल्यांसाठी काहीसे भावूक होतात,
हळवे क्षण आल्यावर काहीसे नाजूक होतात,
तू इतके दिवस हे सारं स्वतःपाशी राखलंय,
तुझ्या डोळ्यांत जे साचलंय,
कदाचित मी ते वाचलंय...

स्वप्नील हुद्दार




.

©Swapnil Huddar #us
तुझ्या डोळ्यांत जे साचलंय,
कदाचित मी ते वाचलंय...
फार काही नाही थोडे ओलसर वाटले,
कुणासाठी सांग ते अश्रू आहेत दाटले ?
तुझं अस्तित्व वाहतं इतरांना जपण्यावर,
म्हणून स्वतःसाठी पाणी उरतं पापण्यांवर,
जगाने पाहू नये इतकी काळजी घेतेस,
हे असं करून स्वतःला किती त्रास देतेस,
जिद्द दिसते तयांत भरारी घेण्याची,
अस्तित्वाला तुझ्या उंचावर नेण्याची,
तरी आपल्यांसाठी काहीसे भावूक होतात,
हळवे क्षण आल्यावर काहीसे नाजूक होतात,
तू इतके दिवस हे सारं स्वतःपाशी राखलंय,
तुझ्या डोळ्यांत जे साचलंय,
कदाचित मी ते वाचलंय...

स्वप्नील हुद्दार




.

©Swapnil Huddar #us