Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाचे हे खेळ निराळे कधी हिवाळे तर कधी उन्हाळे ,

प्रेमाचे हे खेळ निराळे
कधी हिवाळे तर कधी उन्हाळे ,
भेटवस्तु देती प्रेमी
ज्यांचे असती खूप जिव्हाळे !!

कुणी देती फुलं गुलाबी
 देती बाहुल्या कुणी ,
प्रेमामध्ये पडलेली
वेडे असती फार जुनी  !!

एकमेकां पाहण्यासाठी
आतुर असतो जीव फार ,
एकदा का भेटले मग
गळाभेट घेती यार  !!

©Neeraj Shelke
  #happyteddyday2023 #shayardil❤ #writer✍