Nojoto: Largest Storytelling Platform

स्वर लता खरोखर दीदी भाग्यवंत आम्ही दिधला सुरांचा

स्वर लता 

खरोखर दीदी
भाग्यवंत आम्ही
दिधला सुरांचा
प्रसाद तो तुम्ही     १

स्वरांची देवता
लता दीदी आहे
गांधार आपुला
अंतरास मोहे.      २

असह्य कल्पना
नाही करवत
दिदिंच्या अभावी
सारे शुन्यवत.     ३

कलेची साधना
केली खडतर
स्वरांची साधना
त्यांची निरंतर       ३

दिनानाथ कन्या
 गळा तिचा गोड
अखंड रियाज
त्रिलोकी अजोड    ४

हे मेरे वतन 
गाणे ते अमर
डोळे पाणावती
ऐकुनी ते स्वर.       ५

शब्द आज स्तब्ध
 भास्कर थांबला
 आसवे गोठली
 नाद हरवला.       ६

शोधू आता कुठे
स्वर्गीय आवाज
स्वरलते विना
मौन स्वर साज.    ७

देण्या अनुभुती
 देवांना स्वर्गात
जाई स्वरलता
शुन्यत्व लोकात.   ८

जाहले पोरके
संगीत आमुचे
स्वर लते विना
काही नसे साचे ९

पोरकी धरती
सुने ते संगीत
स्वर लते वीन
नाही ऐकवत. १०

©somadatta kulkarni #LataMangeshkar