Nojoto: Largest Storytelling Platform
somadattakulkarn8359
  • 436Stories
  • 148Followers
  • 5.7KLove
    88.3KViews

somadatta kulkarni

  • Popular
  • Latest
  • Video
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

राम लहरी

धुंद झाले अवघे त्रैलोक्य
राम लहरी उमटल्या येथ
राम नामात दंग झाले सर्व
नाही दुःखाचा लवलेश तेथ  १

भवसागर खास पार होईल
अविनाश ब्रम्ह समजेल
घेता रामनाम निशिदिनी
संसाराचे मर्म उमजेल.  २

©somadatta kulkarni

117 Views

8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

स्वातंत्र्यवीर  सावरकर


अवध्य असे मी | पुत्र भारताचा

वीर आहे साचा | या भूमीचा       १


सोडून संपदा |करी देश सेवा

इंद्र करी हेवा |सुपुत्राचा              २


अभिनव भारत |संघटना थोर

 कार्य आहे फार |सुपुत्रांचे            ३


ब्रिटिशांनी दिली |जन्मठेप शिक्षा

नच मागे भिक्षा | त्यांच्या पुढे           ४


भोगी कष्ट बहु | नाही ती विश्रांती

कष्टविली कांती |देशासाठी              ५


सेल्युलर जेल |तीर्थक्षेत्र झाले

उदोकार चाले |दास म्हणे               ६


सोमदत्त कुलकर्णी

©somadatta kulkarni
  #snowpark
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

शीर्षक:  काय करावे?


विचारात हरवून गेलो 

काय करावे काही सुचेना

येता तुझी मुर्ती सामोरी

मज दुसरे काही दिसेना   १


तव स्वरूपात हरवलो

माझे काही ‌मुळी न राहिले

जळी काष्टी पाषाणी सर्वत्र

फक्त एक तुजला पाहिले   २


येतो पुन्हा तो नवा दिवस 

नवी आशा नी नवी उमेद

काय करावे नच सुचते

पण नाही होणार नाउमेद  ३


नाही येथे पर्याय कष्टास

श्रम करणे हे प्राप्त आहे

श्रम जीवी मम आयुष्यात

भगवान मी सदैव पाहे    ४

©somadatta kulkarni
  #snowpark
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

शीर्षक: जत्रा

आहे सर्व पंचक्रोशीत
ख्यात मम गावची जत्रा 
आज चाललो मी जत्रेत
घेऊनी रुपये सतरा       १

खाईन आज पाणी पुरी
खेळणार मी सर्व खेळ
होतो खर्च काय सांगावे
नाही बसत ईथे मेळ   २

खुप खुप मजा करीन
जत्रा मित्रांसवे पाहीन
नाही उद्याची चिंता मज
आनंदी सदैव राहिन    ३

आहे खरी वर्षांची यात्रा
उद्याची शाश्वती नसते
करूया मौज मजा आज
मम हृदयी प्रीत वसते   ४

©somadatta kulkarni
  #MountainPeak
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

काळजी

काळजी कशी घ्यावी
सखया तूझी मी
सदा असावी
नयनात
ठसावी
मूर्ती
ही

आईला लेकराची
काळजी ती फार
सदा मनाची
घालमेल
हो तिची
माता
ती

ईश्वराला भक्ताची
असते काळजी
माता मुलाची
जीवनात
एकची
नाळ
ती

©somadatta kulkarni
  #LongRoad
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

शीर्षक: श्रीमान योगी

शिवरायांची किर्ती
काय मी वर्णावी
राष्ट्र भक्ती राजांची 
शब्दात कशी सांगावी  १

योगियांचा तु राजा
तूच श्रीमान योगी
असूनी छत्रपती
भासे आम्हा जोगी.  २

महामेरू अससी
निश्र्चयाचा भूवरी
विरतेचे गोडवे
गर्जती धरेवरी         ३

पार मुळीच नसे
तव पराक्रमाला
जो तो नमन करी
तुझ्या औदार्याला    ४

हिंदवी स्वराज्याची
उभारणा ती केली
सर्व दूर मराठ्यांची
किर्ती हि तूच नेली  ५

रयतेचा तु राजा
तु प्रजा हित  दक्ष
रयतेच्या हितास
जागृत तव अक्ष.    ६

नीतीवंत जाणता
धर्म शील हा राजा
अखंडित पावतो
रयतेच्या तु काजा. ७

हे हिंदवी स्वराज्य
जाहले तुम्हां कारणे
नाही माहित तुज
शत्रू पूढे हारणे     ८

©somadatta kulkarni
  #MountainPeak
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

निसर्ग

अरे कोण तु मानवा
असा कसा बदलला
पंच महाभूत अंगी
हेही विसरुनी गेला.      १

पृथ्वी आप तेज वायु
अन् आकाश मिळूनी
बने मानवाचा देह
खूण गाठ ठेव मनी.       २

नको तोडू ती मर्यादा
निसर्गाने घातलेली
असो सदैव मानसी
सीमा रेषा ओढलेली.       ३

जप सदा निसर्गाला
खुश असो वसुंधरा
मग तव समृध्दीला
नसेल उणीव जरा.        ४

©®सोमदत्त कुलकर्णी
       हडपसर,पुणे

©somadatta kulkarni
  #hillroad
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

शीर्षक: आयुष्य

नर देह हा दुर्लभ खरा
आपण मनसोक्त जगू या 
क्षण क्षण घालवू आनंदात
स्वर्गीचा आनंद आज लुटू या

©®सोमदत्त कुलकर्णी
       हडपसर,पुणे

©somadatta kulkarni
  #hibiscussabdariffa
8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

विषय: श्रीराम

       हा
     असे 
    श्रीराम
  नित्य वसे 
हृदयी माझ्या
चराचरी दिसे
 श्यामल रूप
   मनी ठसे
    स्वरूप 
      हेच
       ते

©somadatta kulkarni

207 Views

8c0ff89df494a1d85b2764b3251cdb35

somadatta kulkarni

काळा दिवस

चौदा फेब्रुवारी |  काळा दिन खरा 
अतिरेकी मारा | करी भ्याड   १

अकस्मात हल्ला | जाहला तेधवा
 शहीद जाहले    | वीर योद्धे  २

हल्लेखोर होता | हा आत्मघातकी
असे तो पातकी| खरोखर      ३

केला त्याने हल्ला| वाहना सहित
न राहे जिवीत. | हल्लेखोर    ४

चाळीस शहीद | झाले आज दिनी
वाहू मनो मनी. | फुले त्यांना  ५

दास म्हणे आता | त्यांना स्मरूया
अर्पण करूया.   | श्रद्धांजली  ६

©somadatta kulkarni
  #HappyRoseDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile