Nojoto: Largest Storytelling Platform

एकदा त्या भास्कराला मानवाचा राग आला राग येता तापला

एकदा त्या भास्कराला मानवाचा राग आला
राग येता तापला तो खूप लालेलाल झाला
काय सांगू धावतो रे सारखा मी तो म्हणाला 
सारखा जाळून घेतो माणसासाठी स्वतःला

मानवाचे वागणे हे फार आता दुष्ट झाले
स्वार्थ त्याचा साधण्याला पृथ्विला विद्रूप केले
तोडली झाडे किती ती फार ना पाऊस येतो 
आज पाण्याच्या अभावी सारखा दुष्काळ होतो

वाढते जी उष्णता ही त्यात माझा दोष नाही
दोष सारा मानवाचा भ्रष्ट केले सर्व काही
आजही ना वेळ गेली वागणे आता सुधारा
मानवा हो आज जागा मी तुला देतो इशारा

वापरा पाणी जपूनी सांगतो मी झाड लावा
वाढल्याने उष्णता ही ना कुणाला ताप व्हावा
काय ते होईल सांगा मी चिडूनी बंड केले 
राग माझा वाढला नी धावणे मी बंद केले

©जितू
  #Morning
jitendriyaoka1434

जितू

New Creator

#Morning #Poetry

153 Views