Nojoto: Largest Storytelling Platform
jitendriyaoka1434
  • 20Stories
  • 13Followers
  • 1.1KLove
    4.9KViews

जितू

  • Popular
  • Latest
  • Video
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

मैत्रीण जवळची तुला मानले होते
ते निभावले मी मनापासुनी नाते
नेहमी तुझ्या मी मदतीसाठी आलो 
मग सांग कुठे मी चुकलो

का तुझे वागणे सतत बदलते आहे 
हा अबोला तुझा मला खटकतो आहे 
मोकळेपणाने विचार ये तू सारे 
ते प्रश्न तुला पडणारे

म्हणतेस जरी विश्वास तुझ्यावर आहे 
मग मनी तरीही शंका कसली आहे 
मी सांगत आलो तुलाच सगळे काही 
काहीच लपवले नाही

ये बोलू आपण दोघे शांतपणाने 
होईल मळभ बघ दूर मनीचे त्याने
काळजी सखे मज तुझी वाटते आहे 
तू सांग खरे जे आहे

शंकेला नात्यामध्ये स्थान नसावे
विश्वासाचे कोंदण नात्यास मिळावे
संवाद मोकळा दोघांमध्ये व्हावा 
नात्यात गोडवा यावा

©जितू #TereHaathMein
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

White  छोटेसे हे गाव आमचे नदीकिनारी वसलेले 
सभोवताली लक्ष ठेवण्या डोंगर असती बसलेले 
सायंकाळी नदीकिनारी आवडते मज फिरायला 
जाउन तेथे जरा एकटे झाडाखाली बसायला

नसतो कोलाहल कुठलाही शांत वाटते खूप इथे
अनेक वेळा डोळे मिटुनी बसुन राहतो मीच तिथे
कानावरती पडतो केवळ खळखळाट त्या पाण्याचा 
सुखद वाटतो थंडगार मज स्पर्श वाहत्या वाऱ्याचा 

अंतर थोडे चालुन जाता मंदिर आहे स्वामींचे 
सायंकाळी तिथे चालते कीर्तन त्यांच्या नामाचे
रोज आरती असते तेथे मेळा जमतो भक्तांचा
ऐकू येतो नाद दूरवर मंदिरातल्या घंटांचा

सुंदर दिसतो परिसर सारा मावळतीच्या किरणांनी
किती वेळ मी पहात बसतो दृश्य मनोहर नयनांनी
एक वेगळी गूढ आर्तता मनास माझ्या सुखावते 
पुन्हा पुन्हा येण्यास इथे मन मलाच माझे खुणावते

©जितू #GoodMorning
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

झाली होती पडझड शाळेच्या वास्तूची
इमारत जुनी काल पाडली शाळेची
उरलेले आहे मागे शाळेचेच जोते 
आठवता शाळा पाणी डोळ्यामध्ये येते

पहिल्यांदा शाळेमध्ये आलो होतो जेव्हा 
मनामध्ये भीती थोडी होती माझ्या तेव्हा
रुळलो नंतर आम्ही शाळेमध्ये सारे 
सवंगडी नवे माझे हळूहळू झाले 

शिकवले शिक्षकांनी आम्हा खूप छान 
किती विषयांचे त्यांनी दिले आम्हा ज्ञान
वर्गातल्या सगळ्यांशी गट्टी माझी झाली 
साऱ्यांनी मिळून आम्ही मस्ती खूप केली 

खेळायचो खेळ आम्ही इथे किती न्यारे 
वाटून खायचो येथे डबे आम्ही सारे
अशा खूप आठवणी शाळेच्या आहेत 
मन माझे हरवते गोड त्या क्षणात

एकदा वाटते पुन्हा लहान मी व्हावे 
मित्र मैत्रिणीं सोबत शाळेमध्ये जावे 
मधल्या सुट्टीत कुल्फी चिंचा पेरू खावे
सोनेरी ते क्षण थोडे फिरुनी जगावे

©जितू #good_night
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

झाली होती पडझड शाळेच्या वास्तूची
इमारत जुनी काल पाडली शाळेची
उरलेले आहे मागे शाळेचेच जोते 
आठवता शाळा पाणी डोळ्यामध्ये येते

पहिल्यांदा शाळेमध्ये आलो होतो जेव्हा 
मनामध्ये भीती थोडी होती माझ्या तेव्हा
रुळलो नंतर आम्ही शाळेमध्ये सारे 
सवंगडी नवे माझे हळूहळू झाले 

शिकवले शिक्षकांनी आम्हा खूप छान 
किती विषयांचे त्यांनी दिले आम्हा ज्ञान
वर्गातल्या सगळ्यांशी गट्टी माझी झाली 
साऱ्यांनी मिळून आम्ही मस्ती खूप केली 

खेळायचो खेळ आम्ही इथे किती न्यारे 
वाटून खायचो येथे डबे आम्ही सारे
अशा खूप आठवणी शाळेच्या आहेत 
मन माझे हरवते गोड त्या क्षणात

एकदा वाटते पुन्हा लहान मी व्हावे 
मित्र मैत्रिणीं सोबत शाळेमध्ये जावे 
मधल्या सुट्टीत कुल्फी चिंचा पेरू खावे
सोनेरी ते क्षण थोडे फिरुनी जगावे

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

White 
जीवमात्र हे जन्मती इथे भोगण्या भोग 
देह मिळाला मानवी हा दुर्लभ संयोग 
कर्म करावे चांगले असो अंतरी भाव 
कधी नसावे अंतरी स्वार्थ अहंता हाव

मानव होतो आंधळा स्वार्थ वाढता फार 
पूर्ण कराया वासना करतो‌ मग अविचार
अविचाराने नासते कृती वाढतो राग
फणा काढुनी डोलतो मग द्वेषाचा नाग

नको व्हायला वासना मनातल्या शिरजोर 
उपाय गेले सांगुनी संत महात्मे थोर
अश्व मनाचा साधण्या जरा धिराने वाग
प्रेम खरे घे जाणुनी कर थोडा तू त्याग

ठेव मनी तू जागता अखंड भक्ती भाव 
अहंकार दे सोडुनी नको फुकाचा आव
कृतज्ञतेची भावना मनी नेहमी ठेव 
ओळख आता माणसा अंतरातला देव

©जितू #rajdhani_night
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

शारदे वरदान दे मज
शारदे वरदान दे 
सूर माझे गोड व्हावे 
एवढे मज दान दे

ही तुझी आहे कृपा की 
गायला जमते मला 
भाग्य आहे लाभले हे 
चालतो माझा गळा 
शब्द स्वर लय ताल यांचे 
नेमके मज भान दे

ज्ञान दिधले मज गुरुंनी 
वाट त्यांनी दावली 
त्यामुळे मम संगिताची 
साधना ही चालली 
साधनेला यश मिळू दे 
तू मला स्वरज्ञान दे

साधना चालो निरंतर 
दंभ यावा ना परी 
नम्रता अंगी असावी
लाभली किर्ती जरी 
दान दे तू मज यशाचे
नम्रतेचे वाण दे

©जितू #navratri
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

शारदे वरदान दे मज
शारदे वरदान दे 
सूर माझे गोड व्हावे 
एवढे मज दान दे

ही तुझी आहे कृपा की 
गायला जमते मला 
भाग्य आहे लाभले हे 
चालतो माझा गळा 
शब्द स्वर लय ताल यांचे 
नेमके मज भान दे

ज्ञान दिधले मज गुरुंनी 
वाट त्यांनी दावली 
त्यामुळे मम संगीताची 
साधना ही चालली 
साधनेला यश मिळू दे 
तू मला स्वरज्ञान दे

साधना चालो निरंतर 
दंभ यावा ना परी 
नम्रता अंगी असावी
लाभली किर्ती जरी 
दान दे तू मज यशाचे
नम्रतेचे वाण दे

©जितू
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

White 

असे ही चूक माझी की तुझ्यावर प्रेम मी केले
तुझ्या प्रेमात खोट्या ठार होते आंधळी झाले 
तुझ्या जाळ्यात प्रेमाच्या पुरी मी अडकले होते
दगा देशील तू स्वप्नात ही ना वाटले होते

शपथ मी वाहिली होती तुला रे साथ देण्याची 
किती मी पाहिली स्वप्ने सुखी संसार करण्याची 
खऱे मी प्रेम केले पण तुला कळलेच ते नाही
मला फसवून जाताना तुला ना वाटले काही 

मनावर घाव झालेला कसा शब्दात सांगावा 
कसा विश्वास कोणावर पुन्हा मी सांग ठेवावा
जरी मी यत्न हा करते जुने विसरून जाण्याचा 
मला जाईल अवघड तोडणे तो बंध प्रेमाचा

परी विसरेन मी नक्कीच आता मागचे सारे 
नको काहीच खोटे या मनाला त्रास देणारे
पुन्हा सुरुवात हो करणार आता मीच सगळ्याची
नवी शोधून दुसरी वाट मी चालेन जगण्याची

©जितू #sad_shayari
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

घेईन रजा गावाला जाण्यासाठी
परतून जुन्या त्या क्षणांत रमण्यासाठी
मी गावाला जाईन खूप काळाने
भेटेन वृद्ध आजीस तिथे प्रेमाने

काढेल दृष्ट ती थरथरत्या हाताने 
घेईल जवळ ती मला खूप प्रेमाने  
वाढेल करून मग गरम भाकरी भाजी 
देईल छानशी फळे खायला ताजी

फिरण्यास जरा जाईन नदीच्या काठी 
धावेन पुन्हा मी गुरावासरां पाठी
पाहीन रांग ती पक्ष्यांची उडताना 
ते सूर्यबिंब मावळतीला झुकताना

स्मरतील खुणा मग बालपणीच्या न्याऱ्या 
करतील मनाला आनंदित त्या साऱ्या  
जाईल मनाची निघून मरगळ सारी
लाभेल मनाला माझ्या नवी उभारी

©जितू #SunSet
4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

White माणूस एवढा क्रूर कशाने होतो
आपल्या कृतीने पशूसही लाजवतो 
संताप द्वेष वासना अनावर होते 
वासनेपुढे मग भान कशाचे नसते 

कळतात बातम्या रोज नव्या घटनेच्या 
तोडतात साऱ्या सीमा माणुसकीच्या 
सैतानी वृत्ती जणू मनी संचरते 
स्त्री मोठी अथवा बळी चिमुरडी पडते 

अधमांना ऐशा कठोर शिक्षा द्यावी
जाणीव चुकीची क्षणाक्षणाला  व्हावी
स्त्री म्हणजे केवळ शरीर ऐसे नाही 
स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही 

थांबवा प्रदर्शन सतत तिच्या देहाचे 
शोधावे मिळुनी समाधान प्रश्नाचे
सर्व स्तरांवर याविषयी चर्चा व्हावी 
थांबवण्या घटना ठोस योजना व्हावी

©जितू
  #sad_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile