Nojoto: Largest Storytelling Platform

सीमेवरील जवान रक्तबंबाळ होतो जवान माझा सीमेवरती ल

सीमेवरील जवान

रक्तबंबाळ होतो जवान माझा
सीमेवरती लढताना...
श्र्वास अखेरचा सोडतो आठवत
उंबरठा घरचा ओलांडताना..
            
असेल ती चुलीपाशी अन् माय गोठ्यात
नांगर ओढतोय बाप शेतामध्ये
गुरं नि ढोरं चरताना ‌अन्
तान्हं रडताना दारामध्ये
             
सांडत होते अश्रू अबोल ते
डोळे होते नभाकडे
दिली आहूती या प्राणाची 
काय मागू या देशाकडे
               
व्यर्थ ना हो जाए बलीदान
आहुती देतोय रोज एक जवान
या धरतीचे पुत्र तुम्ही ही
व्हा जागे..आत्मनिर्भर अन् बलवान
                
विसावतोय मी कुशीत माईच्या
देश कुटुंब तुमच्या हवाली
थेंब न सोडणारे तुम्ही रक्ताचा
कोण करणार देशाची रखवाली?

✍️निशा शिंदे/खरात

©nisha Kharatshinde सीमेवरील जवान

#IndianArmy
सीमेवरील जवान

रक्तबंबाळ होतो जवान माझा
सीमेवरती लढताना...
श्र्वास अखेरचा सोडतो आठवत
उंबरठा घरचा ओलांडताना..
            
असेल ती चुलीपाशी अन् माय गोठ्यात
नांगर ओढतोय बाप शेतामध्ये
गुरं नि ढोरं चरताना ‌अन्
तान्हं रडताना दारामध्ये
             
सांडत होते अश्रू अबोल ते
डोळे होते नभाकडे
दिली आहूती या प्राणाची 
काय मागू या देशाकडे
               
व्यर्थ ना हो जाए बलीदान
आहुती देतोय रोज एक जवान
या धरतीचे पुत्र तुम्ही ही
व्हा जागे..आत्मनिर्भर अन् बलवान
                
विसावतोय मी कुशीत माईच्या
देश कुटुंब तुमच्या हवाली
थेंब न सोडणारे तुम्ही रक्ताचा
कोण करणार देशाची रखवाली?

✍️निशा शिंदे/खरात

©nisha Kharatshinde सीमेवरील जवान

#IndianArmy

सीमेवरील जवान #IndianArmy #मराठीकविता