(खरं प्रेम करून आपल्या प्रेमासोबत लग्न न करू शकणाऱ्या तरुणांच्या मनातलं) ती गेली जर मला अर्ध्यात सोडून मी तिच्याशिवाय जगू शकेन का? देव जर देणार असेल मला काही तर आशीर्वाद म्हणून तिला मागू शकेन का? प्रेम तर खूप केलं मी जीवापाड तिच्यावर तर दुसऱ्यासोबत तिला बघू शकेन का? जिथे तिच्या सोबत उभं राहायचं माझं स्वप्न होतं तिथे दुसऱ्याला उभा बघताना मी राहू शकेन का? कळतनकळत खूप स्वप्न बघितलं आम्ही सोबत ते स्वप्न कधीतरी पूर्ण करू शकेन का? जसं माझा जीव कासावीस होतो तिच्याविना तसं तिला माझ्याशिवाय कासावीस होताना बघू शकेन का? वाटेल त्यांच्याशी लढू शकेन मी माझ्या प्रेमासाठी पण ती माझ्यासाठी लढू शकेल का? मी अगदी विश्वासाने उभा आहे तिच्यासोबत तशीच खंबीर ती माझ्यासोबत उभी राहू शकेल का? सारं काही त्यागायला तयार आहे मी तिच्यासाठी ती फक्त एक तरी त्याग माझ्यासाठी करेल का? संपूर्ण आयुष्य मी तिच्यासोबत जगायचं विचार केलं तिनं कधी असं विचार केलं असेल का? आयुष्य एकदाच मिळालं प्रेम ही एकावरच झालं ह्या एका आयुष्यात ती एक कायमची मिळेल का? आता विचार करून ठरवायला वेळ आहे तिच्याजवळ त्या वेळेत ती माझ्या आयुष्याचा विचार करेल का??? ©कधी प्रेम कधी विरह #VickyKatrinaWedding