Nojoto: Largest Storytelling Platform
ashleshmade1531
  • 29Stories
  • 14Followers
  • 331Love
    0Views

कधी प्रेम कधी विरह

  • Popular
  • Latest
  • Video
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White मागणं काही नाही बाप्पा तुला 
फक्त प्रयत्नांना माझ्या साथ दे 
प्रामाणिकपणे शोधतोय मी रस्ता माझा 
फक्त निंदकांना जळणाऱ्यांना तेवढं मात दे...

मागणं काही नाही बाप्पा तुला 
हतबल होऊन थांबलेल्यांना पळ दे 
पार होईल प्रत्येक कठीण रस्ता 
फक्त विरोधकांना तेवढं बळ दे...

फार काही नको बाप्पा तुझ्याकडून 
सगळ्यांना सुखाचा समाधानाचा वर दे 
माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी 
तूझ्या पद्धतीने फक्त धीर दे...

अजून काय मागायचं बाप्पा तुला 
तिरस्कार करणारे भरपूर आहेत त्यांना थोडं संयम दे 
आणि विरहाच्या दुःखात जगणाऱ्यांना 
त्यांच्या वाट्याचं त्यांना हवं असलेलं खरं प्रेम दे...

©कधी प्रेम कधी विरह #Ganesh_chaturthi
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White Google ला सुद्धा माहिती असते 
तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे जात आहात,
YouTube ला सुद्धा माहिती असते तुम्हाला कोणती व्हिडीओ आवडते,
Google Crome ला सुद्धा माहिती असतं तुम्ही काय Search करताय आणि कोणत्या website वर जाताय,
Gmail ला सुद्धा माहिती असतं तुमच्या मोबाईल मध्ये कोणाचा नंबर Save आहे आणि तुम्ही कोणाला Massage करताय,
    सांगायचं तात्पर्य हेच  की,
हे माणसानेच तयार केलंय आणि आपण यांना फक्त एकदाच Order दिलाय तरीही ते आपलं ऐकतात,आपल्याला काय हवं हे समजून घेतात, आणि हवं ते पुढे आणून देतात,
पण, आपण जन्मापासून किंवा कित्येक वर्षांपासून एखाद्याच्या सोबत वाढतो,क्षणोक्षणी सोबत वावरतो,अनेकांसोबत काही वर्ष घालवतो आणि तरीही सोबत राहून सुद्धा हे माहिती नसतं आपल्याला काय हवं, काय आवडतं, काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, हे काहीच माहित नसतं...
माणसाने तयार केलेली यंत्र माणसांपेक्षा जास्त माणसाला समजून घेतात की काय?
कारण, खरं तर यंत्र भेदभाव करत नाही हे सगळं करताना,
की, हा माणूस कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा,श्रीमंत की गरीब हे काहीच बघत नाही,
पण माणसे हे सगळं बघून आयुष्य जगतात 
कारण, बरेचदा आपल्याला काय हवं यापेक्षा समाजाला काय आवडतं हे बघून आपण आपलं आयुष्य जगतो.

©कधी प्रेम कधी विरह #Sad_shayri
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White आयुष्यात खरं प्रेम मिळायला भाग्य लागतं 
प्रत्येकांच्या नशिबात ते नसतं 
ज्यांच्या नशिबात मिळालं खरं प्रेम 
त्यांना त्याचं महत्व लवकर कळत नसतं...

वेळ निघून गेलेली असते ती 
जेव्हा खऱ्या प्रेमाचं महत्व कळतं 
जेव्हा समजायला लागतं दूर गेलेला माणूस 
तेव्हाच मात्र ते आपल्या जवळ नसतं..

वस्तू असो किंवा व्यक्ती आपल्याजवळ 
त्याचं मोल आपल्या आयुष्यात तेव्हा काहीच नसतं 
हा मात्र सवय लावून दूर निघून गेलेली व्यक्ती 
पुन्हा मिळवणं फारच कठीण असतं...

वेळ हातात असते तेव्हा जपणं फार महत्वाचं 
तेव्हा मिळवण्यासाठी लढणं गरजेचं असतं 
जर निघून गेली व्यक्ती आयुष्यातून कायमची 
तेव्हा हातात मात्र काहीच उरत नसतं...

आयुष्यात एकदाच मिळते संधी कोणतीही 
त्या संधीला सहज गमवायचं नसतं 
मिळालेल्या संधीचे सोने करणं आपल्या हातात असतं 
ते मिळवण्यासाठी मनात जिद्द, बळ आणि प्रेम फार असावं लागतं...

©कधी प्रेम कधी विरह #moon_day
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

प्रेम विवाहाच्या आड येणारी महत्वाची गोष्ट म्हणजे-
जात -पैसा -संपत्ती -समाज 
आणि याव्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे -
स्वतःचं मन 
कारण, मनाचा ठाम निर्णय असेल तर तो कुणीही बदलू शकत नाही आणि 
कोणतीही गोष्ट लग्नाच्या आड येऊ शकत नाही,
आणि मन तयार नसेल तर कोणत्याही अडचणी, समस्या ह्या सुटू शकणार नाही.
काही मिळवायचं असेल तर समस्यांना तोंड देऊन प्रयत्न करावंच लागते...
त्याशिवाय कुठलीही गोष्ट सहज मिळणार नाही...
आणि विशेष म्हणजे आपले संकुचित विचार 
जे लोकांच्या बोलण्यामुळे बदलतात...
जन्म आपला, मृत्यू आपली आणि मधातलं आयुष्य आपलं 
ते जगायचं ही आपल्याला आपल्या मनाप्रमाणे 
तरीही आपण विचार करतो मान सन्मानाचा, लोक समाजाचा, जाती धर्माचा, गरीब श्रीमंतचा,
आपल्याला काय हवं, कशासाठी हवं ते आपल्याला कळायला हवं,
कारण, त्याचे महत्व आपल्याला कळतं इतरांना काहीच माहिती नसतं आपल्या मनाबद्दल आपल्या विचारांबद्दल...

©कधी प्रेम कधी विरह #RajaRaani
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

(खरं प्रेम करून आपल्या प्रेमासोबत लग्न न करू शकणाऱ्या तरुणांच्या मनातलं)

ती गेली जर मला अर्ध्यात सोडून 
मी तिच्याशिवाय जगू शकेन का?
देव जर देणार असेल मला काही 
तर आशीर्वाद म्हणून तिला मागू शकेन का?

प्रेम तर खूप केलं मी जीवापाड तिच्यावर 
तर दुसऱ्यासोबत तिला बघू शकेन का?
जिथे तिच्या सोबत उभं राहायचं माझं स्वप्न होतं 
तिथे दुसऱ्याला उभा बघताना मी राहू शकेन का?

कळतनकळत खूप स्वप्न बघितलं आम्ही सोबत 
ते स्वप्न कधीतरी पूर्ण करू शकेन का?
जसं माझा जीव कासावीस होतो तिच्याविना 
तसं तिला माझ्याशिवाय कासावीस होताना बघू शकेन का?

वाटेल त्यांच्याशी लढू शकेन मी माझ्या प्रेमासाठी 
पण ती माझ्यासाठी लढू शकेल का?
मी अगदी विश्वासाने उभा आहे तिच्यासोबत 
तशीच खंबीर ती माझ्यासोबत उभी राहू शकेल का?

सारं काही त्यागायला तयार आहे मी तिच्यासाठी 
ती फक्त एक तरी त्याग माझ्यासाठी करेल का?
संपूर्ण आयुष्य मी तिच्यासोबत जगायचं विचार केलं 
तिनं कधी असं विचार केलं असेल का?

आयुष्य एकदाच मिळालं प्रेम ही एकावरच झालं 
ह्या एका आयुष्यात ती एक कायमची मिळेल का?
आता विचार करून ठरवायला वेळ आहे तिच्याजवळ 
त्या वेळेत ती माझ्या आयुष्याचा विचार करेल का???

©कधी प्रेम कधी विरह #VickyKatrinaWedding
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White हे मात्र 100 % खरं आहे... हो ना..
वस्तू किंवा व्यक्ती जवळ असेपर्यंत त्याला फारशी 
किंमत आपण देत नाही..
हवं तेवढं महत्व देत नाही..
हा मात्र तेच कायमचं दूर गेल्यावर त्याची किंमत कळते,
त्याची कमतरता भासत असते नेहमी...
आणि काही गोष्टी परत मिळवता येत नाही 
तेव्हा पच्छाताप केल्याशिवाय पर्याय नसते..
म्हणून जवळ आहे तर जपणं फार महत्वाचं असतं..
वस्तू असो किंवा व्यक्ती..

©कधी प्रेम कधी विरह #love_shayari
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 
तुझ्यावर थोडं लिहावंसं वाटतं 
जगातील सारं सुख तुला मिळावं 
देवाला मागणं म्हणून हे सांगावंसं वाटतं...

स्वभावावर थोडं तूझ्या लिहावंसं वाटतं 
मन तुझं किती सुंदर हे जगाला सांगावंसं वाटतं 
असतील अनेकांचे विचार वेगळे तुझ्याबद्दल 
पण खरं रूप तुझं जगासमोर मांडावंसं वाटतं...

बोलण्यात आहे थोडी कणखर अनं कडक 
पण प्रेमळ ही तितकीच हे सांगावंसं वाटतं 
सर्वगून संपन्न अशी तुझी छबी 
तुझ्याकडून बरंच काही मागावंसं वाटतं..

खूप वेदना असतात ना मनात तूझ्या 
म्हणून तू तुझं आयुष्य आनंदी जगावं असं वाटतं 
सोड विचार करणं जगाचा फारसा 
आज वाढदिवसाला हे आवर्जून तुला सांगावंसं वाटतं...

©कधी प्रेम कधी विरह
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

टूट जाऊंगा मैं भी एक दिन
पूरी तरह 
अगर छोड जाओगे तुम मुझे |
रहुंगा इस भरी महफिल में 
लेकिन कभी ढुंढ ना पाओगे तुम मुझे |
बस जिंदगी गुजरेगी युहीं मेरी 
बिना जान के 
फिर जिंदा कभी कर ना पाओगे तुम मुझे |
पछताओगे या नहीं पता नहीं उस वक्त 
लेकिन पा ना सकोगे उस वक्त तुम मुझे |

©कधी प्रेम कधी विरह #lightning
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

White गर्व नको जास्त 
पैसा,संपत्ती,जात आणि सौन्दर्यावर..
लाज नको जास्त 
गरिबी,कपडे,गरीब आई-बाप आणि परिस्थिती वर..
माज नको जास्त 
पद,प्रतिष्ठा,शिक्षण आणि राहणीमानावर..
भय नको जास्त 
काम,भविष्यकाळ,पुढील रस्ता आणि आपल्या निर्णयावर..
विश्वास नको जास्त 
नातेवाईक,मैत्री,नातं आणि लबाड लोकांवर..
विचार नको जास्त 
भूतकाळ,वर्तमान आणि भविष्य काळावर..

अश्लेष माडे (प्रीत)

©Ashlesh Made #sad_shayari
f19f4f06697b9eaa635432d533cd3f01

कधी प्रेम कधी विरह

अनेक पाहिले मी
कुणी ना सारखी तूझ्या
एकवचणी जशी
शपथा जपती माझ्या

ह्या खोट्या जगात
खऱ्या गोष्टी तूझ्या
तुझ्यासारखी फक्त तूच
अय बाळा माझ्या

सुख-दुःखाची सोबती
जरी वेदना तूझ्या
खऱ्या प्रेमाची सोबती
मिळाली आयुष्यात माझ्या..

©Ashlesh Made #us
loader
Home
Explore
Events
Notification
Profile