White ☕ तिने अचानक चहा साठी विचारलं... ☕ खूप दिवसांनी नंबर तिचा चमकला, मन थोडं दडपलं होतं, तिचा फोन कधी पुन्हा येईल मला कधीच वाटलं नव्हतं... उगाच का फोन केला असं वाटलं, पण उचलल्यावर तिने सहज विचारलं – "चल, चहा प्यायला जाऊया का ?" पुन्हा एकदा त्याच टपरीवर दोन कटिंग घेऊया का? क्षणभर मी गप्प झालो, कधीच न झालेली ही मागणी, मनात अनेक प्रश्न उठले, पण ओठ मात्र फक्त "हो" म्हणाले… ती समोर बसली तशीच, अगदी जुन्या आठवणीतली, न बोलताही खूप काही सांगणारी, त्या चहासारखी ओळखीची आणि आवडती… दोन कटिंग आले टेबलावर, तिने चमच्याने एक हलकासा ढवळला, मी तिच्या डोळ्यात साखर शोधत होतो, आणि ती त्या वाफेत भूतकाळ वाचत होती… "कसा आहेस?" तिने विचारलं, मी हसलो आणि म्हणालो, "नेहमीसारखाच..." तू कशी आहेस विचारायचं राहून गेलं, कारण तिच्या डोळ्यातलं उत्तर सांगून गेलं… पहिल्या घोटासोबत आठवणी दाटल्या, दुसऱ्या घोटासोबत जुनं प्रेम जागं झालं, आणि शेवटच्या घोटासोबत समजलं, की काही नात्यांना शेवट नसतो, फक्त विराम असतो… चहा संपला, पण वेळ मात्र थांबली होती, तिने हलकसं हसत "चल निघते" म्हटलं, मी तसाच बघत बसून राहिलो, पुन्हा भेटू का, असं विचारायचं धाडसच झालं नाही… ती निघून गेली, प्रेमाची वाफ मात्र तशीच राहिली, क्षणभर भूतकाळात हरवून बसलो, कटिंगचा रिकामा कप हातात घेतला, आणि हलकंसं पुटपुटलो – "पुन्हा कधी तरी..." ©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #love_shayari #chay #Love #Life #Poetry