Nojoto: Largest Storytelling Platform

बेफिकीर नाचवली गेली नारी असंख्य शत्रूंच्या दरबारात

बेफिकीर नाचवली गेली नारी असंख्य शत्रूंच्या दरबारात 
पण, जिथे वाचवली अब्रू तो "छत्रपतींचा" दरबार  होता.
जिथे मुघली बडी बेगम माजवे अन्यायाने हाहाकार..,
पण, "रयतेस सांभाळा" हा "जिजाऊंचा" संस्कार होता.
जिथे लचके तोडण्यास हपापलेले मुघल दाखवी धार,
पण, त्या भगव्यास "येसूबाई" साहेबांचा आधार होता.!
केला असेल छळ त्या औरंग्याने हैवानासम निर्दयाने,
पण, एका काव्यानेच केला तो "धाकल्याधन्याचा" प्रहार होता.!
❤️❤️ Vaish-New ❤️❤️

©Vaishnavi Pardakhe
  #ShivajiMaharajJayanti