Nojoto: Largest Storytelling Platform

White #नात्यांची जहरी नाळ.... शब्दवेडा किशोर रोज

White #नात्यांची जहरी नाळ....
शब्दवेडा किशोर 
रोज माझ्या उशाला शापित अन् विखारी
माझ्याच भूतकाळाच्या आठवांचा काळ
सावळीसम माझ्या संगतीस आहे
ओठावर नात्यांच्या ओळखीचे नाव अन्
डोळ्यात विरहजाळासोबत अजूनही
हा गर्दीमय एकटेपणाचा अवघड असा शाप आहे
जगण्यासोबतच आता झोपही माझी
विझूनी गेलीय तरीही हाती अजूनही
स्वप्नांचा तोच लाजिरवाणा सांभाळ आहे
हक्काची नाती आयुष्यातून झाली
काही काळाआधीच वजा
विरली ती त्याला चांदण्यात जरी
माझे अजूनही आतुरलेले फाटके
अन् रिते कोरडे ते आभाळ आहे
नाते सारे भावनांचे इतके सुलभ नसतात
हे शिकवणारं माझं दरिद्री भाळ आहे 
अन् अजूनही कुठंतरी एक अंधुकशी
शापित माझ्याशी जोडलेली या साऱ्याची
एक जहरी नाळ आहे

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
White #नात्यांची जहरी नाळ....
शब्दवेडा किशोर 
रोज माझ्या उशाला शापित अन् विखारी
माझ्याच भूतकाळाच्या आठवांचा काळ
सावळीसम माझ्या संगतीस आहे
ओठावर नात्यांच्या ओळखीचे नाव अन्
डोळ्यात विरहजाळासोबत अजूनही
हा गर्दीमय एकटेपणाचा अवघड असा शाप आहे
जगण्यासोबतच आता झोपही माझी
विझूनी गेलीय तरीही हाती अजूनही
स्वप्नांचा तोच लाजिरवाणा सांभाळ आहे
हक्काची नाती आयुष्यातून झाली
काही काळाआधीच वजा
विरली ती त्याला चांदण्यात जरी
माझे अजूनही आतुरलेले फाटके
अन् रिते कोरडे ते आभाळ आहे
नाते सारे भावनांचे इतके सुलभ नसतात
हे शिकवणारं माझं दरिद्री भाळ आहे 
अन् अजूनही कुठंतरी एक अंधुकशी
शापित माझ्याशी जोडलेली या साऱ्याची
एक जहरी नाळ आहे

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर