White #एक वादळाची वाट...... शब्दवेडा किशोर आयुष्यात अचानक उठणारी ही वादळं फार भयंकर असतात.घोंगावत्या या वादळात विचारांचा कचरा होतो अन् मनातला हा पालापाचोळा आपल्या भोवती आपल्यालाच गरागरा फिरवतो. जेव्हा ही वादळं क्षमतात तेव्हा आपलं सारं अस्तित्व तुटलेलं,भंगलेलं अन् पूर्णपणे विखूरलेलं असतं अन् मग आपसूक मन पुन्हा नव्यानं तोच पालापाचोळा वेचायला लागतं.. आयुष्यात नव्याने येणाऱ्या वादळांच्या तयारीसाठी.... ©शब्दवेडा किशोर #वादळवाट