Nojoto: Largest Storytelling Platform

पटलं तर घ्या! शेला टोपी साडीसोबत चिटपीस सजवत असतो

पटलं तर घ्या!

शेला टोपी साडीसोबत चिटपीस सजवत असतो,
वापरत नाही कुणी तरीही जो तो मिरवत असतो!

खेळातल्या चेंडूसारखी नुसतीच अदलाबदली,
घेणारा अन् देणाराही आहेर फिरवत असतो!

गिलास वाटी गडवा तांब्या तशी पाण्याची टाकी,
छोट्यामोठ्या भेटवस्तुने साजत रुखवत असतो!

सोडून द्याव्या रितीभाती मजला वाटते खोट्या, 
उगाच माणूस कुचकामाचा पाढा गिरवत असतो!

देत राहावी भेट पुस्तके कार्यप्रसंगी आता,
अंगिकारा नव्या विचारा जयराम विनवत असतो!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #VickyKatrinaWedding