Nojoto: Largest Storytelling Platform

आताशा स्पर्श् काय असतो तेच माहित नाही ,होवून आपले

आताशा स्पर्श् काय असतो तेच 
माहित नाही ,होवून आपले
स्पर्श् वांझोटे ,उगाच आठवायचे
थोटी झालेली भावना आणि
रिकाम्या मनातील ,रिकामे भाते
कधी मऊ गुलाबी हातांची ओंजळ
स्पर्श्यानी भरून जायची त्यात 
उबदार नयनजलांची तळी भरायची,
कधी अधिरांच्या पाकळ्या 
गळून पडायच्या ह्या पाकळ्यांच्या 
खुणा कधी सर्वांगावर उठायच्या,
कधी पदस्पर्शाने रोमांग फुलायचे,
आणि उगाच करांच्या ,हिंदोळ्यावर झुलायचे 
कधी चोरटे स्पर्श् आणि चोरटे 
कटाक्ष ह्याने अंतर्मनाचा ठाव 
घ्यायचा ,एकमेंकांच्या डोळ्यात 
आपला परिकथेतील स्वप्नांचा 
गाव पाहायचा, 
आता ओळखीचे अनोळखी काही 
स्पर्श् भेटतात पण त्यात 
बऱ्याचदा वळवंटातील 
मृगजळेच असतात ,आपण मृग 
होवून हुंदडावे ,आणि उगाच 
मग भुकेल्या वाघाची शिकार व्हावे,
म्हणून काही कोष बांधून घ्यावे म्हणते,
अलगद भावनांचा एक एक रेशमी 
धागा सोडून निस्वार्थी नात्याचे 
अजीर्ण असे वस्त्र  विणावेसे वाटते

             पल्लवी फडणीस,भोर✍
आताशा स्पर्श् काय असतो तेच 
माहित नाही ,होवून आपले
स्पर्श् वांझोटे ,उगाच आठवायचे
थोटी झालेली भावना आणि
रिकाम्या मनातील ,रिकामे भाते
कधी मऊ गुलाबी हातांची ओंजळ
स्पर्श्यानी भरून जायची त्यात 
उबदार नयनजलांची तळी भरायची,
कधी अधिरांच्या पाकळ्या 
गळून पडायच्या ह्या पाकळ्यांच्या 
खुणा कधी सर्वांगावर उठायच्या,
कधी पदस्पर्शाने रोमांग फुलायचे,
आणि उगाच करांच्या ,हिंदोळ्यावर झुलायचे 
कधी चोरटे स्पर्श् आणि चोरटे 
कटाक्ष ह्याने अंतर्मनाचा ठाव 
घ्यायचा ,एकमेंकांच्या डोळ्यात 
आपला परिकथेतील स्वप्नांचा 
गाव पाहायचा, 
आता ओळखीचे अनोळखी काही 
स्पर्श् भेटतात पण त्यात 
बऱ्याचदा वळवंटातील 
मृगजळेच असतात ,आपण मृग 
होवून हुंदडावे ,आणि उगाच 
मग भुकेल्या वाघाची शिकार व्हावे,
म्हणून काही कोष बांधून घ्यावे म्हणते,
अलगद भावनांचा एक एक रेशमी 
धागा सोडून निस्वार्थी नात्याचे 
अजीर्ण असे वस्त्र  विणावेसे वाटते

             पल्लवी फडणीस,भोर✍