निर्भया कानूनावर विश्वास नाही असे नाही परंतु प्रक्रियेवर विश्वास नाही. या कालावधीमध्ये आरोपी जर आरोप साबित न झाल्यामुळे बाहेर जर फिरत राहिला तर तो निर्भीड बनेल व अजून अशा कितीतरी अत्याचार करण्यास तो मुक्त राहील. पोलिसांचे काय? FIR दाखल करण्यासाठी त्या मुलीच्या परिजनांना या पोलीस स्टेशन पासून त्या पोलीस स्टेशन पर्यंत चकरा घालाव्या लागतात. क्राईम झाल्यानंतर पोलीसांची गाडी शव पडताळण्यासाठी येते, यावर तत्काळ ॲक्शन होत नाही का पोलिसांना त्याचे गांभीर्यच वाटत नाही? प्रशासन! सगळ्यात मोठी जबाबदारी तर प्रशासनाची आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार खुर्चीसाठी ओढाताण करणारा हा वर्ग, ज्यांना खुर्ची दिसते पण जळत असलेला तो देह, क्रंदन करत असणारी ती माता, दिगभ्रमित झालेला तो पिता, घामाघूम झालेला तिचा भाऊ, कासावीस झालेली तिची बहीण दिसत नाही का ?खुर्ची सांभाळणाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत, जर तिथे तुमची आई, बहीण मुलगी असली तर तुमची काय प्रक्रिया असती ?का तेव्हाही तुम्ही ॲक्शन घेण्यास एवढाच delay केला असता?? आज प्रतिपक्षा वरही माझे सवाल आहेत , परिस्थितीवरील उपायांवर चर्चा करण्या ऐवजी आढळित रूढ पक्षावर कसे आरोप करावे याची चर्चा जास्त केली जाते. का समाज स्वार्थी बनला आहे? जिथे तिथे मीडियापासून सर्वजण परिस्थितीचा फायदा घेऊन, आपला फायदा कसा करावा या विचारात आहेत. परंतु परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यावर चर्चा कुणाचीच नाही. इथे फक्त प्रशासन , कानून न्यायव्यवस्था, पोलीस एवढेच जबाबदार नाहीत ,तर समाजही तेवढाच जबाबदार आहे. का आज हा पुरुषप्रधान समाज आपल्या पत्नीला ती रिस्पेक्ट देत नाही ज्याची ती हकदार आहे, तिला आपल्या साऱ्या खुशीला आशा -आकांक्षाला मारून जगावे लागते? घरातील ही पुरुषांची वागणूक कुठेतरी नकळत आपल्या मुलांना चुकीचे शिकवणूक देऊन जाते. आज समाजातील प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांना त्यांच्या मुलांमध्ये ही जाणीव करणे आवश्यक आहे की स्त्रियांचा सन्मान करावा. घरामध्येही तेच समानतेचे वातावरण असावे. मंदिरात जाऊन लक्ष्मी सरस्वतीची पूजा जरूर करा परंतु त्या आधी घरातील लक्ष्मीची आराधना करा. आज ऍडव्हर्टाईसमेंट ,मीडिया मूवी, सगळ्यांवर ही माझे प्रश्न आहेत स्त्रीला फक्त सौंदर्यासाठी प्रतिबिंबित करू नका, तिचे टॅलेंट, तिची प्रतिभा तिची साधना, याचा प्रचार- प्रसार जास्त करण्यावर फोकस ठेवा. आज कानून, समाज, सगळ्यातही बदल होण्याची आवश्यकता आहे तरच मग समाजात दुसरी कुठलीही मुलगी निर्भया बनणार नाही......... Sudha betageri (बागलकोट) ©Sudha Betageri #sudha