प्रत्येक शब्द तुझा हवा हवा सा वाटतोय श्वास माझा अगदी उच्चांक गाठतोय . . न जाने काय केली आहेस तू जादू प्रत्येक क्षण आपला सोबतचा माझ्या मनाच्या कोपऱ्यात साठतोय प्रथम झाला आहे मला असा अनुभव प्रथमच घेत आहे मी प्रेमाची चव. . सांगू शकत नाहीये मी भावना माझ्या जणू कोमल पानांवर प्रथमच पडलेत दव. . दूर राहून होतो तुझा भास . . माहित नाही तू का झाला आहेस इतका खास नव्हते आधी मी अशी मन मोकळी जणू तू जिंकून घेतला आहेस माझा श्वास अंतर क्षणात संपून गेले . . जेव्हा मी तुला पाहिले . . कधी नव्हती अशी भावना मनी का कोणास ठाऊक कधी तुझ्यात मी हरवून गेले . . #तुझी भावना