पिडा उरी हुंदक्याला उगा पोसतो का? किती डंख झाले तया मोजतो का? इथे दुःख आहे सदा सोबतीला, नको खेद मानू जिवा कोसतो का? गुलाबासभोती आहे फास मोठा तरी त्यास काटा कधी टोचतो का? झटक सर्व चिंता नको ताण घेऊ, फुकाची पिडा ती वृथा सोसतो का? असो भोग काही तथा वेदना त्या, सलोखा सुखाचा मना बोचतो का? जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #HAPPY_ROSE_DAY