White #हा प्रवास आयुष्याचा.... शब्दवेडा किशोर उद्या कुठे मुक्काम नाही माहित आता थोडे बोलू काही रात्र अजुनी बाकी आहे आता थोडे बोलू काही जीवन कठीण गाणे सूर जुळले आहेत आता थोडे बोलू काही दूरवर चालायचे तर आता थोडे बोलू काही रिमझिम पाऊस येतो आहे म्हणून आडोशाला जरा थांबून आता थोडे बोलू काही गारव्यात शेकोटी पेटली आहे आता थोडे बोलू काही वळण अजून दूर आहे आता थोडे बोलू काही आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटते आता थोडे बोलू काही वाटते सुख दुःखात आपला कुणी साथीदार असावा आता थोडे बोलू काही जीवनात सांजवेळी असेन मी नसेन मी म्हणून आता थोडे बोलू काही.. ©शब्दवेडा किशोर #आयुष्यातीलचारक्षण