अहम काजव्याला कशाचा असावा! अरे गर्व तो भरवशाचा असावा तयारी न करता गझल बांधतो मी उथळ भाव जैसा सशाचा असावा! रिकामीच झोळी नसे शब्द साठा अहंकार का मग खिशाचा असावा गुरूंनी दिले ज्ञान समजून घ्यावे तुला वारसा त्या वशाचा असावा! पराभूत झालो तरी थांबलो ना खरा ध्यास आता यशाचा असावा! नको अमृतासम सुखे जीवनी मज कडू घोट थोडा विषाचा असावा! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ ©Satish Deshmukh गझल #JumuatulWidaa