Nojoto: Largest Storytelling Platform
satishdeshmukh1541
  • 36Stories
  • 3Followers
  • 301Love
    333Views

Satish Deshmukh

  • Popular
  • Latest
  • Video
f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

White वाटले होते मला की वाटिका आहे
जिंदगी सारी इथे शोकांतिका आहे

शेतमालाची फुकट बोली तुम्ही लावा
कास्तकाराला कुठे उपजीविका आहे

वाटते वाचून घ्यावे मी तुला आता
केवढी सुंदर तुझी अनुक्रमणिका आहे

भिमरायाचा उजळ माथा बघितल्यावर
वाटतो हा सूर्यही आता फिका आहे

बारशाचे एवढे कौतुक नको ना रे
जन्म माझा तेरवीची पत्रिका आहे

©Satish Deshmukh गजल
f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

वाहत्या पाण्यात फिरतो गरगरा आहे
जन्म माझाही क्षणाचा भोवरा आहे

फार थकले हे असे बोलू नका कोणी
बाप माझा एक ताजा मोगरा आहे

तू दिला आधार ओठी गोड ओठांचा
याहुनी मोठा कशाचा हादरा आहे

घेउनी बसला विचारांची तिजोरी अन्
नेमका चोरीस गेला चेहरा आहे

जिंकली आकाशगंगा तू जरी होती
कोणत्या विवरात आता मकबरा आहे

हा तुझा मानू नको मुक्काम कायमचा
सोयरा आहे तू येथे सोयरा आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मोबाईल नंबर  ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh
  #Friend भोवरा
f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

उन्हाने तप्त झालेला महासागर तुझ्यामध्ये
तरी पाऊस देणाऱ्या ढगांचे घर तुझ्यामध्ये

किती उत्साह लोकांचा किती बाजार गजबजले
दिवाळीला न पिकलेले मुके वावर तुझ्यामध्ये

डबल इंजिन ट्रिपल इंजिन असू द्या आजची सत्ता
उद्या मतदान देताना खरी पावर तुझ्यामध्ये

तुरुंगाची न ईडीची तुला नाही भिती कुठली
कमवली जी स्वकष्टाने अशी भाकर तुझ्यामध्ये

तळ्या तुज लागली हल्ली तहानेची सवय कारण
तिरावर रोज येणारी वसे घागर तुझ्यामध्ये

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ
मो. न. 7038267576

©Satish Deshmukh महासागर

#titliyan
f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

पराचा कावळा
(भुजंगप्रयात /२०/लगागा/४) 

किती झूठ हा सोहळा होत आहे
पराचा जणू कावळा होत आहे

मिळाला दगा आजपर्यंत कारण
भरवसा तुझा आंधळा होत आहे

इडीचा दरारा विचारात घेता
गजाचा झणी मुंगळा होत आहे

नको माणसा द्वेष पोटात ठेवू
विषारी उरी कोथळा होत आहे

विचारा जरा मुंबईच्या मनाला
वडापाव का ढोकळा होत आहे

मदतगार झाले बुरे म्हणविणारे
भल्यांचा मला अडथळा होत आहे

खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा
गझल साधनेचा मळा होत आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ

©Satish Deshmukh पराचा कावळा

#Mountains

पराचा कावळा #Mountains #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile