Nojoto: Largest Storytelling Platform

"हसरे दुःख..🌸!" Read Caption.. "हसरे दुःख"..अश

"हसरे दुःख..🌸!"

Read Caption.. "हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून!‌ या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो वा वयस्कर! खरंच, दुःखाची कारणं तर भरपूर असतात, त्या दु:खांपासून तर पळतासुद्धा येत नाही! असं म्हणतात, दुःख अालं की सुख, आणि सुख आलं की दुःख हे चक्र प्रत्येकाच्या आयुष्यात चालू तर राहणारच! माणूस सुखी असताना त्याला वाटतं, हे जग खूप सुंदर आहे, या आयुष्याचा आनंद लुटावा..कारण ते एकदाच मिळतं!‌ पण एक प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे..आपण सर्वजण दुःखात असतांना मात्र हे वाक्य सोडून, याच्या विरुद्धच का म्हणून जातो?..
‌‌  या जगात पाऊल ठेवलंय तर सगळ्या समस्यांना सामोरं तर जावं लागणारच! लहान मुलाला चॉकलेट न मिळाल्याचं दुःख नाहीतर मोठ्या कोणत्या व्यक्तीला कामामुळे किंवा एकटं पडल्यामुळे होणार दुःख!..यांमध्ये दुःख तर त्या छोट्या मुलाला ही होतं आणि त्या मोठ्या व्यक्तीला पण!..फरक इतकाच‌ की, ते छोटं मुल रडून, हट्ट करून आपलं दुःख दूर करतं कारण त्याचा हट्ट पुरवला जातो, पण मोठ्या व्यक्तीचं दुःख हे हट्ट करून दूर होणारं बिलकुल नसतं ना! माणूस रडतो, दुःख अनावर झालं की आपोआप डोळ्यात आलेलं पाणी जणू काही त्या दु:खालाच दाखवत असतं! कधी आपण रडतो, पण जगासमोर वावरतांना हसण्याचा मुखवटा कधी-कधी आपल्याला परिधान करावा लागतो!..कारण प्रत्येक दु:खाला सामोरं जाण्यासाठी रडणं हाच एक उपाय नसतो! त्याला सामोरं जाऊन लढण्यात खरी मज्जा असते, म्हणूनच की काय मनात दुःख असलं की ते दु:ख त्या हसण्यामागे लपवून आयुष्याची मज्जा घेतली जाते!     
    खरंतर, खरं हसणं आणि खोट हसणं..यात फरक तर खूप मोठा असतो, पण जगायचंय तर त्या दुःखाला विसरून हसण्याताच खरी मज्जा वाटते! दुःख तर कधी संपणार नाही, ते तर एकामागून एक आयुष्यात येतच राहील..तेव्हा *"हे ही दिवस जातील!"* असं म्हणून त्या प्रत्येक दुःखाचा सामना करत हसून दुःखाचा नाश केला पाहिजे!
  सुखी असताना तर प्रत्येक जण हसतो..दुःखात मात्र चेहऱ्यावर ते हसू कधी-कधी जाणूनबुजून आणावं लागतं! हसण्यात एक जादू असते, म्हणूनच की काय..सर्कसमध्ये तो विदूषक हसवणारा वाटतो पण त्याच्या आतही दुःख असेल याचा आपल्याला अंदाजही येत नाही..कारण तो आनंदी राहतो आणि आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो!
  हसताना असं वाटतं की, आयुष्य खूप कमी आहे आनंदासाठी..पण दु:खात असतांना वाटतं..आयुष्य का इतकं मोठं असतं! "दुःख" खरंतर