"एकी" आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय.. जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..! आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची... येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..! काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती.. स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.! पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..! जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची.. हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..! दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली.. शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..! स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे.. आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..??? आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला.. जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..! 🚩🚩समर्पित🚩🚩 मराठी एकीकरण समिती मराठी बोला चळवळ मराठी अस्मिता श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"