Nojoto: Largest Storytelling Platform

White फातिमा! निर्भयतेने लढणारी फातिमा उस्मान शे

White फातिमा! 

निर्भयतेने लढणारी फातिमा
उस्मान शेखची बहीण होती
स्त्रि शिक्षणाची मशाल पेटविणारी
फातिमा  समाजाची ढाल होती!

परंपरेला न जुमानता 
घरोघरी जाऊन साक्षरतेचे धडे दिले, 
जात, धर्म बाजुला ठेवून
इथल्या बहुजनांना शिकविले! 

सावित्रीसोबत शिक्षण घेऊन
शाळेत जाऊन शिकवू लागली
शिक्षणाची ढाल पाठीशी घेऊन
पहिली मुस्लिम शिक्षिका झाली! 

घर सोडले फुले दाम्पत्याने
तेव्हा आसरा दिला फातिमाने
शाळा उघडली सावित्रीने
तेव्हा सहकार्य केले नैतिकतेने! 

अन्यायाचा प्रतिकार करत
न्याय दिला  गोरगरिबांना
स्त्रियांच्या पाठीशी खंबीर राहुन
कणखर बनवलं दीनदुबळ्यांना!

©komal borkar #sad_quotes  मराठी कविता संग्रह
White फातिमा! 

निर्भयतेने लढणारी फातिमा
उस्मान शेखची बहीण होती
स्त्रि शिक्षणाची मशाल पेटविणारी
फातिमा  समाजाची ढाल होती!

परंपरेला न जुमानता 
घरोघरी जाऊन साक्षरतेचे धडे दिले, 
जात, धर्म बाजुला ठेवून
इथल्या बहुजनांना शिकविले! 

सावित्रीसोबत शिक्षण घेऊन
शाळेत जाऊन शिकवू लागली
शिक्षणाची ढाल पाठीशी घेऊन
पहिली मुस्लिम शिक्षिका झाली! 

घर सोडले फुले दाम्पत्याने
तेव्हा आसरा दिला फातिमाने
शाळा उघडली सावित्रीने
तेव्हा सहकार्य केले नैतिकतेने! 

अन्यायाचा प्रतिकार करत
न्याय दिला  गोरगरिबांना
स्त्रियांच्या पाठीशी खंबीर राहुन
कणखर बनवलं दीनदुबळ्यांना!

©komal borkar #sad_quotes  मराठी कविता संग्रह
komalborkar6567

komal borkar

New Creator