Nojoto: Largest Storytelling Platform
komalborkar6567
  • 2Stories
  • 14Followers
  • 99Love
    0Views

komal borkar

  • Popular
  • Latest
  • Video
81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

White समाजसुधारक महात्मा फुले

मुलींसाठी शाळा सुरू करून
स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखविला
पाण्याचा हौद चालू करून, 
अस्पृश्यांचा नवा इतिहास घडविला... 

सावत्रीआईना शिकवून
नवा आदर्श समाजासमोर ठेवला
नाव्ह्यांचा संप घडवून , 
अनिष्ठ रुढीपरंपरेचा त्याग केला... 

मनुवाद्यांशी लढा देऊन
मूलनिवासी लोकांना न्याय दिला 
विधवा पुनर्विवाह  करून
महिलांचा सन्मान केला... 

बहुजनासाठी शाळा सुरू करुन
मनुवाद्यांवर घणाघाती प्रहार केला
सत्यशोधक समाजाची स्थापना करुन, 
सत्य आणि मानवतेचा लढा दिला... 

शिक्षणासाठी वस्तीगृह चालू करुन
अनेकांचा उध्दार केला
गुलामगिरीला नष्ट करून, 
बहुजनांचा क्रांतिकारक होऊन गेला...

©komal borkar #sad_quotes समाजसुधारक महात्मा फुले मराठी कविता

#sad_quotes समाजसुधारक महात्मा फुले मराठी कविता #मराठीकविता

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

White संविधान 

अंधारच होता नशिबी आमच्या
संविधान देऊन परिवर्तित केलं भीमानं, 
जेव्हा माणूस माणसांचा गुलाम होता, तेव्हा
समानतेचा हक्क  देऊन, गुलामी दुर केली संविधानानं. 


चुल आणि मुलंच आमचं अस्तित्व म्हणत
50टक्के आरक्षण देऊन साक्षर केलं स्त्रीयांना, 
पतिच्या संपत्तीत समान वाटा देऊन
सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला संविधानानं. 


आरक्षन देऊन अठरा पगळ जातिला 
बळकट बनवलं इथल्या बहुजनांना, 
स्वातंत्र्य देऊन इथल्या भारतीयांना
सुट-बुटात आणलं संविधानानं. 


प्रसुती रजा देऊन मातेला
गर्भातल्या बाळाची काळजी घेतलं संविधानानं, 
जन्मताच हक्क प्रदान करून
भारतीय होण्याचा सन्मान मिळाला संविधानानं.

©komal borkar #sad_quotes संविधान दिवस

#sad_quotes संविधान दिवस #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile