Nojoto: Largest Storytelling Platform

*मोहरली लेखणी साहित्य समुह आयोजित लावणी कार्यशाळा

*मोहरली लेखणी साहित्य समुह आयोजित लावणी कार्यशाळा उपक्रम*

*विषय:-घुंगरू*
**********************************************************
वयात आली, अंगानं भरली,उपवर मी झाली,
अंगापिंडान भरली काया, मुखावर पांगली लाली.!!धृ!!

नाजूक पायी चाळ बांधले,थिरकत आले जवळी, 
प्रितीत घेऊन गोंजरा राया,भरल्या कातरवेळी
घालवू नका वेळ,आता सांज बघा झाली.!!१!!

अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली..।।१।।

चला सोबतीने जाऊ,ठसक्यात लावणी गाऊ,
घुंगराची सारी माया,मनात भरून पाहू 
आस तुमच्या संगतीची लागली!!२!!

अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली.

थयथय करता घुंगरू वाजे,शब्दांच्या तालात
काळजाचा ठाव वाया जाई,मन वेडे  घुंगराच्या नादात
सख्या मला तुमची भुरळ ही पडली!!३!!

अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली....!
------------------------------------------------------
*✍️ प्रा.राजेंद्रकुमार शेळके*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke लावणी 

#feellove

लावणी #feellove #poem