TEACHER'S DAY ----------------------- अक्षरांच्या वनातून, सुंदर सुंदर शब्दरूपी फुलांना वेचून वाक्य रूपी माळ बनवण्याची शिकवणूक देणारे वंदनीय गुरु........ खडूची धारेधार तलवार आणि काळीकुट्ट फळ्यांची ढाल धरून अज्ञानरूपी अंध:काराशी अविरत लढा देणारे वंदनीय गुरु......... ज्ञानाचे पंख लावून, आशा आकांक्षा रुपी आगसात उंच भरारी मारण्यास, प्रोत्साहित करणारे वंदनीय गुरु........ बिघडलेल्या मुलांचा काठीने इलाज करून, शिक्षणरूपी औषधाचा लेप लावणारे, समाज सुधारक वंदनीय गुरु........ विद्यार्थ्यांच्या बुद्धी संवेदनाला जागृत करून, सशक्त सुंदर समाज निर्मितीचे मार्गदर्शक वंदनीय गुरु........ ज्ञानरूपी अमूल्य संपत्ती प्रदान करणाऱ्या या गुरूंना कोटी कोटी प्रणाम.... ©Sudha Betageri #sudha