Nojoto: Largest Storytelling Platform

केले जरी कौतुक सा-यांनी तरी, वेड्या मना तू असा भा

केले जरी कौतुक सा-यांनी तरी, 
वेड्या मना तू असा भारावून जाऊ नको...

मुखवट्यावरी मुखवटे चढवून येती लोक सारे,
भावनांच्या बाजारात वाहवत जाऊ नको...

केले वार काळजात आपल्यांनी जरी,  
ते वार असे तू उगा झेलू नको...

असे भास-आभासी दुनिया ही सारी,
स्वतःस टाकून मृगजळा मागे तू धावू नको...
 
स्वार्थाने येती जवळ सारे,
या साऱ्या मोहामध्ये तू अडकू नको...

अन्यायाचा कर प्रतिकार दुर्गा होऊनी,
स्वतःलाच खंजीर खुपसून घेऊ नको... 

गुलाबा परी असे सुंदर जरी तू,
पाशवी लांडग्यांच्या हाती लागू नको... 

विश्वातील तू सुंदर कलाकृती बघ,
आत्मविश्वास असा तू गमवू नको...

लढा अस्तित्वाचा लढ धीराने, 
हताश असा तू होऊ नको...

तोड सारे पाश भितीचे,
उगाच घाबरून जगू नको...

घे भरारी उंच आभाळापल्याड,
काही केल्या माघार आता घेऊ नको
© - निर्मला खैरे.. ✍️✍️

©Swapnil Huddar #standAlone
केले जरी कौतुक सा-यांनी तरी, 
वेड्या मना तू असा भारावून जाऊ नको...

मुखवट्यावरी मुखवटे चढवून येती लोक सारे,
भावनांच्या बाजारात वाहवत जाऊ नको...

केले वार काळजात आपल्यांनी जरी,  
ते वार असे तू उगा झेलू नको...

असे भास-आभासी दुनिया ही सारी,
स्वतःस टाकून मृगजळा मागे तू धावू नको...
 
स्वार्थाने येती जवळ सारे,
या साऱ्या मोहामध्ये तू अडकू नको...

अन्यायाचा कर प्रतिकार दुर्गा होऊनी,
स्वतःलाच खंजीर खुपसून घेऊ नको... 

गुलाबा परी असे सुंदर जरी तू,
पाशवी लांडग्यांच्या हाती लागू नको... 

विश्वातील तू सुंदर कलाकृती बघ,
आत्मविश्वास असा तू गमवू नको...

लढा अस्तित्वाचा लढ धीराने, 
हताश असा तू होऊ नको...

तोड सारे पाश भितीचे,
उगाच घाबरून जगू नको...

घे भरारी उंच आभाळापल्याड,
काही केल्या माघार आता घेऊ नको
© - निर्मला खैरे.. ✍️✍️

©Swapnil Huddar #standAlone